मुख्यमंत्री ठाकरेंच्या खुर्चीखाली नाना पटोलेंचा स्वबळाचा फटाका ! - under the chief ministers chair nana patole plant the own firecracker | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

मुख्यमंत्री ठाकरेंच्या खुर्चीखाली नाना पटोलेंचा स्वबळाचा फटाका !

अतुल मेहेरे
सोमवार, 14 जून 2021

कॉंग्रेसला जर कुणी हरवू शकत असेल, तर ती म्हणजे फक्त कॉंग्रेस. कॉंग्रेसचे नेते एकत्र येऊन लढले तर काय होऊ शकते, हे नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीने दाखवूनच दिले आहे. त्या निवडणुकीपासून कॉंग्रेस नेत्यांचा आत्मविश्‍वास बळावला आहे.

नागपूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Mr. Nana Patole यांनी कोरोनाची तीव्रता कमी होताच राज्याचा झंझावाती दौरा काढला आहे. विदर्भातील एक-एक जिल्हा ओलांडल्यानंतर ते पुढे निघाले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी वक्तव्य करून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात ‘हलचल’ वाढवली  By making the verious statements cause a stir in politics आणि मुख्यमंत्रिपदावर दावा करून तर त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. पण त्यांचे हे आव्हाने नेमके कुणाला आहे, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांच्या खुर्ची खाली त्यांनी स्वबळाचा फटाका लावल्याचे प्रकर्षाने जाणवते. 

आपल्या दौऱ्यात नाना प्रत्येक जिल्ह्यात जाऊन स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. यासाठी हायकमांडही तयार आहेत, असे ते सांगतात. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार होण्याचीही तयारी त्यांनी केली आहे. राज्याच्या राजकारणात वावरताना प्रत्येकालाच मुख्यमंत्री व्हावेसे वाटते. त्यात गैर काहीच नाही. पण मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवून नानांनी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिल्याचे दिसत आहे. एकंदरीत काय तर नानांनी साडेतीन वर्षांनंतर होणाऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आत्तापासूनच चुरस निर्माण केली आहे.  यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, याची प्रतीक्षा आहे. 

इकडे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही महाविकास आघाडीचे सरकार पडण्याची वाट बघत आहे. किंबहुना सरकार पाडण्यासाठी वाट्टेल तसे प्रयत्न करताना दिसतात. ही बाब कुणापासूनही लपलेली नाही. पण शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हे सरकार पूर्ण पाच वर्ष टिकेल आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, असे याआधीच जाहीर केले आहे. त्यामुळे या उर्वरित साडेतीन वर्षांत तरी देवेंद्र फडणवीस यांचा नंबर लागेल, असे वाटत नाही आणि महाविकास आघाडीत सत्तेत असताना नानांनी जी महत्त्वाकांक्षा जाहीर केली, ती या साडेतीन वर्षांसाठी नव्हे, तर सरकारने हे पाच वर्ष पूर्ण केल्यानंतरच्यासाठीची आहे. येवढे मात्र स्पष्ट आहे. 

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहेत, तसे ते लढतीलही. महाराष्ट्राचा आजवरचा इतिहास बघता शरद पवारांनी राजकारणात भल्याभल्यांना धोबीपछाड दिली आहे. त्यामुळे नाना पटोले यांची महत्वाकांक्षा ते सहजासहजी पूर्ण होऊ देतील, असे सध्यातरी वाटत नाही. २०१९ च्या निवडणुकीत जशी पायाला चक्री लावून ते फिरले, तसे पुन्हा २०२४ मध्ये राज्यभर फिरतील, प्रसंगी पुन्हा पावसात भिजतील. पण तेव्हा महाविकास आघाडी असेल की नसेल, यासाठी मात्र वाट बघावी लागणार आहे.  

घरवापसी कार्यक्रमात किती यश ?
नाना पटोलेंनी राज्यव्यापी दौऱ्यात घरवापसी कार्यक्रम राबविलेला आहे. त्यासाठी ते प्रचंड मेहनत घेत आहेत. आजपर्यंत कॉंग्रेसमधून दुसऱ्या पक्षांत गेलेल्या (खासकरून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये) लोकांना ते ‘घरवापसी’ अंतर्गत पुन्हा कॉंग्रेसमध्ये आणत आहेत. याची सुरूवात त्यांनी आपल्या गृहजिल्ह्यातून केली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल जे चार-चार महिने भंडारा-गोंदियात येत नव्हते, ते आता महिन्यातून चारदा गृहजिल्ह्यात येतात. भंडारा-गोंदियातून पटेल नानांना समोर जाऊ देणार नाही, असे येथील राजकीय धुरीणांना वाटते. त्यामुळे नानांनी जाहीर केलेली मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा त्यांना कुठवर घेऊन जाईल, हे येणारा काळच ठरवेल. 

हेही वाचा : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला पेरणीचा शुभारंभ

कॉंग्रेसचे नेते एकत्र आल्यास अवघड नाही
कॉंग्रेसला जर कुणी हरवू शकत असेल, तर ती म्हणजे फक्त कॉंग्रेस. कॉंग्रेसचे नेते एकत्र येऊन लढले तर काय होऊ शकते, हे नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीने दाखवूनच दिले आहे. त्या निवडणुकीपासून कॉंग्रेस नेत्यांचा आत्मविश्‍वास बळावला आहे आणि हे नेते एकत्र आले तर कॉंग्रेसचा मुख्यमंत्री होणे तेवढेही अवघड नाही. पण मुद्दा हा आहे की, नाना पटोले मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुढे आल्यावर किती नेते त्यांच्या सोबत राहतील? महत्त्वाकांक्षी नाना सर्वांना सोबत घेण्यात यशस्वी झाले तर मुख्यमंत्रिपद त्यांच्यापासून फार लांब आहे, असे वाटत नाही. त्यांच्याकडे तब्बल साडेतीन वर्षांचा अवधी आहे. या कालावधीत महाराष्ट्रात आणि कॉंग्रेसमध्ये काय काय घडामोडी होतात, यावर सर्व निर्भर आहे.

विदर्भाची साथ महत्वाची…
विदर्भाने ज्या पक्षाला साथ दिली, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा मुख्यमंत्री होणे असल्यास प्रदेशाध्यक्षांना उर्वरीत महाराष्ट्राप्रमाणेच विदर्भातही जोर लावावा लागेल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख