अपराजित, युवा योद्धा ७३ व्या वर्षीही उतरला निवडणुकीच्या रणांगणात...

हरिद्वार खडके १९७२ मध्ये पहिल्यांदा सावरगड ग्रामपंचायतीच्या आखाड्यात उतरले. पहिल्या प्रयत्नातच खडके हे विरोधकांवर मात करीत मताधिक्याने निवडून आले आणि उपसरपंच झाले. त्यानंतर मात्र खडके यांनी कधी मागे वळून बघितलेच नाही.
Haridwar Khadke
Haridwar Khadke

यवतमाळ : त्यांच्याकडे बघितल्यावर ते ७३ वर्षाचे म्हातारे दिसतात. पण त्यांचे काम बघितल्यावर ७३ वर्षांचा म्हातारा की ७३ वर्षाचा तरुण, हा प्रश्‍न तुम्हाला पडल्यावाचून राहणार नाही.  या वयात ते ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. गेल्या ४५ वर्षांपासून सतत ९ वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी जिल्ह्यात केला आहे. त्यामुळेच ते आज सर्वांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. 

गेल्या 45 वर्षांपासून अपराजित राजकारणी असलेले हरिद्वार खडके वयाच्या 73 व्या वर्षीही ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात उभे आहेत. 1972 पासून त्यांनी नऊ पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुका लढवल्या आणि प्रत्येक निवडणुकीत ते अपराजित राहिले. सरपंच, उपसरपंच अशी पदे त्यांच्या वाट्याला आलटून पालटून आली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सावरगडचा विकास झाला पाहिजे, हे स्वप्न खडके यांनी1972 मध्ये बघितले होते आणि पहिली निवडणूक लढविली. जिंकून येताच ते सत्ताधारी बनले. त्यानंतर गावाच्या राजकारणात त्यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. 

हरिद्वार खडके १९७२ मध्ये पहिल्यांदा सावरगड ग्रामपंचायतीच्या आखाड्यात उतरले. पहिल्या प्रयत्नातच खडके हे विरोधकांवर मात करीत मताधिक्याने निवडून आले आणि उपसरपंच झाले. त्यानंतर मात्र खडके यांनी कधी मागे वळून बघितलेच नाही. गावाचा विकास साधत सावरगड ग्रामपंचायतीच्या प्रत्येक निवडणुकीत ते निवडून आले. त्यातूनच त्यांनी १९७२ ते २०२० या कालावधीत तब्बल २० वर्ष सरपंच, १५ वर्ष उपसरपंच आणि दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य, अशी ४५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून राजकीय कारकीर्द गाजविली. 

निवडणूक कोणतीही असो, विजयाची माळ खडके यांच्या गळ्यात पडलीच समजा. कारण तसे समीकरणच तयार झाले आहे.  ग्रामपंचायतीची कामे असो की, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय कुठेही खडके अगदी एखाद्या तरुणाप्रमाणे जनतेच्या मदतीला धावतात. त्यामुळे ते गावकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com