उपराजधानीतील २०० निवासी डॉक्टर सामूहीक रजेवर, रुग्ण वाऱ्यावर...   - two hundred resident doctors in nagpur are on leave sick on wind | Politics Marathi News - Sarkarnama

उपराजधानीतील २०० निवासी डॉक्टर सामूहीक रजेवर, रुग्ण वाऱ्यावर...  

केवल जीवनतारे
मंगळवार, 1 जून 2021

मार्डच्या निवासी डॉक्टरांसह आंतरवासीय (इंटर्नस) डॉक्टरांचे आंदोलन होते. त्यांनीही काळ्याफिती लावून काम केले. लातूरच्या एमआयटी मेडिकल कॉलेजचा एमबीबीएस अंतिम वर्षाचा विद्यार्थी डॉ. राहुल विश्वनाथ पवार कोरोना व काळ्या बुरशीची लागण झाल्याने औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात उपचार घेत होता. त्याचा मृत्यू झाला.

नागपूर : तीन वर्षाच्या अभ्यासक्रमातील दीड वर्ष फक्त कोरोनच्या रुग्णांची सेवा करण्यात गेले. त्यामुळे आमचा इतर विषयांचा अभ्यास अपूर्ण राहीला आहे. Our study of other subjects is incomplete खरं म्हणजे इतर अभ्यास झालाच नाही. त्यामुळे आता यापुढे आम्हाला कोरोना रुग्ण वगळता इतर रुग्ण तपासण्याची संधी द्यावी, Patients other than the corona patient should be given the opportunity to be examined अशी मागणी करीत आज नागपुरातील २०० निवासी डॉक्टर संपावर गेले. 200 resident doctors went on strike डॉक्टरांच्या या पावित्र्यामुळे रुग्ण वाऱ्यावर सोडले गेले आहेत. 

तीन वर्षांचा आमचा अभ्यासक्रम. दीड वर्ष कोरोना रुग्णांची सेवा करण्यात लोटले. विविध विषयांतील अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी आल्यांनतर केवळ एकाच विषयाचा अभ्यास करायचा का? असा सवाल निवासी डॉक्टरांचा आहे. पुढील दीड वर्ष आम्हाला नॉनकोविड रुग्णांना तपासण्याची संधी हवी आहे. तसेच कोरोना वगळता इतर शैक्षणिक अभ्यासक्रमावर परिणाम होत आहे. यामुळे नॉन कोविड रुग्णांची जबाबदारी देण्यात यावी अशी एकमुखी निवासी डॉक्टरांनी आज मेयो रुग्णालयात केली आहे. 

मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाला मेडिकलमधील साडेतीनशेवर निवासी डॉक्टरांनी पाठींबा दिला आहे. राज्यभरातील निवासी डॉक्टरांची सद्या एकच ओरड आहे. दोन दिवसांपुर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत निवासी डॉक्टरांना इतर अभ्यासक्रमासाठी विशेष वेळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले, मात्र आता आश्वासनाचा डोस नको, निर्णय घ्या, अशी एकमुखी मागणी त्यांनी केली.

मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. रजत अग्रवाल,डॉ. आसिफ पटेल, डॉ. ईश्वर पाटील, डॉ. गणेश पारवे, डॉ. आशिष केंद्रे, डॉ. अद्वैत मुळे, डॉ. सुभाष पाटील, डॉ. सुजाता मेटे, डॉ. ख्याती जैन यांच्यासह शेकडो डॉक्टर मेयो परिसरात उभारलेल्या मंडपात दिवसभर बसून होते, यामुळे मेयो रुग्णालयातील रुग्ण वाऱ्यावर अन दोनशेवर निवासी डॉक्टर सामूहीक रजेवर असे चित्र मेयोत तयार झाले होते. 

हेही वाचा : परमबीर सिंग यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून वाझेंकडे दिले होते महत्वाचे तपास... 

इंटर्नस डॉक्टरांनी लावल्या काळ्या फिती
मार्डच्या निवासी डॉक्टरांसह आंतरवासीय (इंटर्नस) डॉक्टरांचे आंदोलन होते. त्यांनीही काळ्याफिती लावून काम केले. लातूरच्या एमआयटी मेडिकल कॉलेजचा एमबीबीएस अंतिम वर्षाचा विद्यार्थी डॉ. राहुल विश्वनाथ पवार कोरोना व काळ्या बुरशीची लागण झाल्याने औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात उपचार घेत होता. त्याचा मृत्यू झाला. कोरोना काळातील रुग्णसेवेचे मानधन तसेच विमा कवच तर मिळत नाही, यामुळेच नाराज झालेल्या आंतरवासीय डॉक्टरांनी कालपासून काळ्या फिती लावून काम केले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख