तुपकरांनी अभियंत्याला उतरवले खड्ड्य़ात, अन् म्हणाले यापुढेही दंडुकेशाही करूच... - tupkar lowered the engineer into the pit and said i will continue be a bully | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

तुपकरांनी अभियंत्याला उतरवले खड्ड्य़ात, अन् म्हणाले यापुढेही दंडुकेशाही करूच...

संजय जाधव
शुक्रवार, 4 जून 2021

या योजनेचे काम करताना सिमेंट रस्ता किंवा डांबरी रस्ता असेल आणि कामादरम्यान तो खोदला असेल, तर तो पूर्ववत करून दिला पाहिजे, अशी तरतूद केलेली आहे. पण अनेक लोकांच्या घरांसमोर खोदकाम करून ठेवलेले आहे.

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर Ravikant Tpukar यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण Maharashtra Jeevan Pradhikaran विभागाचे जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता आर. एन. भिलवडे R. N. Bhilwade यांना खड्ड्य़ात उतरवून काम करायला लावले. त्यांच्या या दंडुकेशाहीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. The video of this tyranny went viral यावर सामान्य जनता अडचणीत असताना अधिकारी काम करत नसतील आणि अशी दंडुकेशाही करावी लागत असेल, तर यापुढेही आम्ही ती करू, असे तुपकर Ravikant Tupkar म्हणाले.

जनता अडचणीत असताना त्यांना दिलासा देण्यासाठी असे करावे लागत असेल, तर त्याला रविकांत तुपकरांची दंडुकेशाही म्हणावी का आणि जेव्हा विनंती, मागणी आणि माणुसकीची भाषा अधिकाऱ्यांना कळत नसेल, तर काय करावे? जनतेसाठी कितीही वेळा कायदा हातात घेण्यासाठी आम्ही मागेपुढे पाहणार नाही. कारण आमच्यासाठी सामान्य लोक महत्वाचे आहेत, असे तुपकर असेही ते म्हणाले. युवा नेते रविकांत तुपकर यांचे नाव समोर येताच शेतकऱ्यांसाठी आक्रमकतेने झगडणारा नेता डोळ्यांसमोर येतो. कधी-कधी तर रविकांत तुपकर अधिकाऱ्यांना धारेवर धरून आपल्याच स्टाईलने कामे करून घेतल्याचेही प्रकारही आपण ऐकले आणि पाहिले असतील. 

यावेळी रविकांत तुपकरांनी दंडुकेशाहीने आपल्या घरासमोरील पाइपलाइन लिकेजचे काम जिल्ह्याच्या कार्यकारी अभियंत्याकडून करवून घेतल्याचा प्रकार हाती लागलेल्या एका व्हिडिओमुळे समोर आला आहे. यामुळे रविकांत तुपकर यांच्या दादागिरी स्टाईलमुळे ते अधिकारी वर्गात चर्चेत येणार, हे मात्र निश्‍चित. हाती लागलेला व्हिडिओ हा काही दिवसांपूर्वीचा आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता आर. एन. भिलवडे यांनाच अपमानास्पद वागणूक देऊन दमदाटी करीत दंडुक्याचा धाक दाखवून चक्क आपल्या घरासमोरील पाइपलाइनचे लिकेजचे काम करण्यासाठी खड्ड्य़ामध्ये उतरून काम करून घेण्याचा प्रताप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केल्याचे एका व्हिडिओमुळे समोर आले आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये बुलडाणा शहर पोलिस स्टेशनचे काही पोलीस कर्मचारी गणवेशात व काही कर्मचारी साध्या गणवेशात दिसत आहे. 

यासंदर्भात जारी केलेल्या व्हिडिओमध्ये तुपकर म्हणतात, सावळा सुंदरखेड ही बुलडाणा शहराला लागून असलेली मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये १५.५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मागच्या सरकारमध्ये अथक प्रयत्नांतून आम्ही मंजूर करवून घेतली. २०१५ पासून ही योजना मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करीत होतो. योजना मंजूरही झाली. खामगावच्या देशमुख नावाच्या कंत्राटदाराने या योजनेचे काम घेतले. सुंदरखेडमध्ये कामासाठी खड्डेही खोदून ठेवले आहेत. या खड्डयामध्ये लोकांचे अपघात होत आहेत. लहान मुले खेळताना पडून जखमी होताहेत, अशा तक्रारी आमच्याकडे आल्या. त्यामुळे १५ दिवस मी कार्यकारी अभियंत्यांच्या मागे लागलो. हे काम करताना जुनी पाइपलाइन खोदून ठेवलेली आहे. त्याचे लिकेज काढलेले नाहीत. 

हेही वाचा : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर जिल्हाध्यक्षांवर का चिडले ?

या योजनेचे काम करताना सिमेंट रस्ता किंवा डांबरी रस्ता असेल आणि कामादरम्यान तो खोदला असेल, तर तो पूर्ववत करून दिला पाहिजे, अशी तरतूद केलेली आहे. पण अनेक लोकांच्या घरांसमोर खोदकाम करून ठेवलेले आहे. त्याचा त्रास त्यांना सहन करावा लागतोय. त्यामुळे १५ दिवसांपासून मी अभियंत्यांच्या मागे लागलो होतो, की पाइपलाइन फोडल्यामुळे लोकांच्या घरी पाणी येत नाही आणि खड्ड्य़ांचा त्रास आहे. हे काम लवकर पूर्ण करा. पण त्यांनी विषय मनावर घेतला नाही आणि एक दिवस आमचा संयम सुटला आणि कार्यकर्ता जागा झाला. आम्ही अभियंत्याच्या कार्यालयात गेलो, त्याला गाडीमध्ये आणलं, त्याच्या हाती कुदळ-फावडं दिलं आणि ज्या-ज्या ठिकाणी पाइपलाइन फोडून ठेवलेली होती, त्या-त्या ठिकाणचे काम आम्ही त्या अभियंत्याकडून करवून घेतलं. शेवटी स्वाभिमानी स्टाईलनं आम्हाला हे काम करवून घ्यावं लागलं, असे रविकांत तुपकर म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख