तुकाराम मुंढेंचे सीईओपद नियमबाह्य, महापौर जोशींचा दावा 

आयुक्तांच्या सीईओपदी नियुक्ती नियमाने व्हावी, यात गैर नाही. परंतु आयुक्तांनी अधिकार नसतानाही कंपन्यांची बिले काढणे, अधिकाऱ्यांना काढणे, याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत जाब विचारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Tukaram Mundhe 33-Sandip Joshi
Tukaram Mundhe 33-Sandip Joshi

नागपूर : नागपूर स्मार्ट ऍन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या (एनएसएससीडीसीएल) संचालक मंडळाची बैठक येत्या 10 तारखेला असून विषय पत्रिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांची सीईओपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सीईओपद नियमबाह्यरित्या बळकावल्याचे सिद्ध झाले, असा दावा महापौर संदीप जोशी यांनी आज केला. नियमाने चालणारे आयुक्त मुंढे यांनी नियमांची पायमल्ली केल्याच्या महापौरांच्या आरोपामुळे स्मार्ट सिटीची बैठक वादळी ठरण्याची शक्‍यता आहे. 

एनएसएससीडीसीएलच्या संचालक मंडळाची 10 जुलैला बैठक होणार असून कंपनी सचिवांनी या बैठकीसाठी विषय पत्रिका तयार केली. या विषय पत्रिकेतील सहाव्या क्रमांकावर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सीईओपदी नियुक्तीचा प्रस्ताव आहे. यावर महापौर संदीप जोशी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नियमबाह्य कामे केल्याप्रकरणी आयुक्तांवर तोफ डागली. स्मार्ट सिटीच्या अजेंड्यावरून आयुक्ताचे सीईओपद नियमबाह्य असून त्यांनी 18 कोटींचे देयके एका कंपनीला कुठल्या अधिकारात दिले, असा सवाल महापौरांनी केला.

कामाची बिले देण्याबाबत यापूर्वीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाला होता, असे आयुक्त म्हणतात. मागील संचालक मंडळाच्या बैठकीत ज्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली होती. त्यांना कसे काय काढले? असेही महापौर म्हणाले. संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यासाठी तसेच विषय पत्रिकेवर स्वतःच्या नियुक्तीच्या विषयाला प्राधान्यक्रम दिला. परंतु, एनएसएससीडीसीएलचे चेअरमन प्रवीण परदेसी यांनी नियमाप्रमाणे विषय पत्रिकेतील विषयाचा क्रम लावल्याचे महापौर म्हणाले. 

बैठकीत घेणार हरकत 
आयुक्तांच्या सीईओपदी नियुक्ती नियमाने व्हावी, यात गैर नाही. परंतु आयुक्तांनी अधिकार नसतानाही कंपन्यांची बिले काढणे, अधिकाऱ्यांना काढणे, याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत जाब विचारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com