तुकाराम मुंढेंनी जिल्हा परीषदेचा वचपा तर काढला नाही ना ?

सभेत असलेल्या पंचायत समिती सभापतींनी मतदान केले नाही. हा धागा मुंढे यांनी धरला. प्रकरण शासनस्तरावर गेले. शासनाने मुंढेचा मुद्दा मान्य केला आणि अविश्‍वास ठराव फेटाळून लावला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पाठबळ मुंढेना असल्याने त्यांनी जिल्हा परीषदेचा प्रस्ताव नाकारल्याची चर्चा होती.
Tukaram Mundhe
Tukaram Mundhe

नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे सन 2008 मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ होते. त्यावेळी सभागृहात त्यांच्यावर अविश्‍वास ठराव पारित करण्यात आला होता. ही गोष्ट ते विसरले नाहीत आणि आता जेव्हा त्यांना कोरोमुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे जि.प. ने पालिकेचे कविवर्य सुरेश भट सभागृह सभेसाठी मागितले. तर त्यांनी कोणतेही कारण न देता नकार दिला. त्यामुळे तुकाराम मुंढेंनी तेव्हाचा वचपा काढला, अशी चर्चा जिल्हा परीषदेच्या वर्तुळात रंगली आहे. 

2008 मध्ये मुंढे सीईओ म्हणून रुजू झाले. जवळपास सव्वा वर्ष ते पदावर होते. मुंढेंच्या कामाची शैली तशीच होती. पदाधिकारी, सदस्यांना विश्‍वासात घेत नाही, मान देत नाही, समितींना विश्‍वासात न घेता निर्णय घेतात, असेच आरोप तेव्हाही त्यांच्यावर होते. त्यामुळे ऑगस्ट 2008 ला झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव घेण्यात आला. त्यावेळी जिल्हा परिषेदत भाजप, शिवसेनेची सत्ता होती. रमेश मानकर अध्यक्ष होते. तर विद्यमान कृषी सभापती तापेश्‍वर वैद्य त्यावेळी उपाध्यक्ष होते. त्यांचा पुतळाही तत्कालीन सदस्यांनी जिल्हा परिषदच्या आवारात जाळला होता. 

सभा चांगलीच वादळी ठरली होती. सभेत तत्कालीन सीईओ तुकाराम मुंढे यांनी जवळपास 40 मिनिटे भाषण दिले. यात त्यांनी पदाधिकारी, सदस्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. परंतु, सदस्यांचे समाधान झाले नाही आणि अविश्‍वास ठराव घेण्यात आला. याला जवळपास सर्वच सदस्यांनी समर्थन दिले. सभेत असलेल्या पंचायत समिती सभापतींनी मतदान केले नाही. हा धागा मुंढे यांनी धरला. प्रकरण शासनस्तरावर गेले. शासनाने मुंढेचा मुद्दा मान्य केला आणि अविश्‍वास ठराव फेटाळून लावला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पाठबळ मुंढेना असल्याने त्यांनी जिल्हा परीषदेचा प्रस्ताव नाकारल्याची चर्चा होती. भट सभागृह देण्यास नकार देताना महापालिकेने कोणतेही कारण दिले नसले तरी अविश्‍वास ठराव घेतल्यानेच सभेकरिता सभागृह देण्यास नकार दिल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. सभागृह नाकारून मुंढेंनी अविश्‍वास ठरावाचा हिशेब बरोबर केल्याची चर्चा रंगली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com