तिन दिवसांनंतर आज बोलले तुकाराम मुंढे, म्हणाले 106 सदस्यांना एकाच वेळी भेटलो 

शासनाच्या सुचनंनंतरही दारूची दुकाने न उघडली नाही. केवळ गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्तरावर हा निर्णय घेतला. त्यानंतर इतर शहरांमध्ये काहीच दिवसांत बाधितांची संख्या वाढली आणि नागपुरातील बाधितांची संख्या मर्यादेत राहीली. नागपुरात मृत्युदर कमी असल्याचेतुकाराम मुंढे यांनी सभागृहाला सांगितले.
Tukaram Mundhe
Tukaram Mundhe

नागपूर : महानगरपालिकेच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात सर्वसाधारण सभेत गेल्या चार दिवसांपासून सत्ताधारी सदस्यांकडून आयुक्त तुकाराम मुंढेंवर नाही नाही ते आरोप केले जात होते. आज ते आपले उत्तर देणार असल्यामुळे सत्ताधाऱ्यांसह सर्वांनाच ते काय बोलतात, याची उत्सुकता होती. त्यांनी एक-एक करुन सर्व आरोप खोडून काढले. दरम्यान सत्ताधारी सदस्य त्यांना मध्ये-मध्ये थांबवित असल्याने संघर्षाची स्थिती निर्माण झाली आणि दोन वेळा सत्ताधारी व विरोधक आमने-सामने आले. सभागृहात बोलू दिले जात नसल्यामुळे अखेर विरोधकांनी सभात्याग केला. 

मुंढे म्हणाले, मी भेटत नाही, फोन घेत नाही असा आरोप सदस्यांनी केला. पण 106 सदस्यांना एकाच वेळी भेटलो. त्यावेळी सविस्तर चर्चा झाली. त्यानंतरही जे सदस्य आले त्यांनाही भेटलो. पण कोरोनाच्या स्थिती निर्माण झाल्यापासून कुणालाही नाही भेटलो. युद्धजन्य स्थिती असल्यामुळे फोनसुद्धा नाही घेतले, अशा कबुली त्यांनी दिली. शहरातील विकासकामे थांबविली असल्याचा आरोप खोडून काढताना ते म्हणाले, झालेल्या कामांची बिले द्यायला पैसे नाहीत. अशा स्थितीत नवीन देयता निर्माण करायची नाही, म्हणून सुरू झालेली कामे सोडून इतर सर्व कामे थांबविली आहेत. यावर आमदार प्रवीण दटके यांनी आक्षेप घेत तसे लेखी दिले किंवा परीपत्रक काढले आहे का, अशी विचारणा केली. यावरुन दटके आणि कॉंग्रेसचे कमलेश चौधरी आमने-सामने आले. यावेळी ज्येष्ठ सदस्य प्रफुल्ल गुडधे मध्ये पडले आणि हा वाद थांबला. नंतर 19 मार्चला परीपत्रक काढल्याचे आयुक्तांनी सांगितले. पण यामध्ये जुन्या कामांचा उल्लेख नसल्यावरुन पुन्हा दटके आणि विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी आक्षेप घेतला. 

दयाशंकर तिवारीं आणि परिणीता फुके यांनी डॉ. प्रवीण गंटावार यांच्याबाबत केलेल्या आरोपांबाबत मुंढे म्हणाले, बॉम्बे हॉस्पीटल ऍक्‍टनुसार सदर अधिकारी "एनपीए' घेत नसेल तर त्यांना खासगी प्रॅक्‍टीस करता येते. यासाठी 12 डिसेंबर 2019 च्या याचिकेचा दाखला त्यांनी दिला. शिलू चिमुरकर-गंटावार यांनी उपस्थित न राहता मस्टरवर सह्या केल्याचा आरोप होता. यावर त्यांनी तसे केलेले नाही. त्यांच्या 81 दिवसांच्या बिनपगारी रजा कापण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मनोरुग्ण कैसर परवीन यांच्या कुटुंबियांना क्वारंटाईन करताना कैसर परवीनला तीन दिवस डांबून ठेवल्याबाबत मुंढे म्हणाले, एएनएम तेजस्वीनी शेंडे रोज त्यांच्या घरी भेट देत होत्या. मनोरुग्ण असल्या तरी त्या स्वतः स्वयंपाक करु शकतात. त्यांना काहीही अडचण गेली नसल्याचे त्यांचे शेजारी देवांगण यांनी सांगितल्याचे मुंढे म्हणाले. 

खोटं बोलून, काल्पनिक कथा सांगून आपली प्रतिमा निर्माण करण्याच्या आरोपावर मुंढे म्हणाले, पहीला बाधित व्यक्ती आढळल्यानंतर रेल्वे विभागाकडून "त्या' बोगीतील सर्व प्रवाशांची माहीती घेतली. त्यामध्ये तीन-चार बाधित व्यक्ती आढळले. त्यांनंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या 260 लोकांना माहीती देऊन सतर्क केले होते. नाईक तलाव परीसरात झालेल्या बिर्याणी पार्टीबाबत ते म्हणाले, 16 बाधित रुग्ण सापडल्यानंतर तेथील लोकांनी सांगितले की आम्ही विलगीकरणात जायला तयार आहोत. पण ज्या लोकांनी बिर्याणी पार्टी केली, आधी त्यांच्यावर कारवाई करा, असे तेथील लोकांनी पालिकेच्या तिन अधिकाऱ्यांना सांगितले आणि कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग महानगरपालिकेची टिम करते पोलीस नाही. त्यामुळे पोलीसांना त्यांची माहीती नसावी. कनेटेनमेंट झोनच्या बाबत केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या दिशानिर्देशांनुसारच कामे केले असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी क्वारंटाईन केलेल्या लोकांवर केलेल्या खर्चाचीही माहीती त्यांनी सभागृहाला दिली. 

शासनाच्या सुचनंनंतरही दारूची दुकाने न उघडली नाही. केवळ गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्तरावर हा निर्णय घेतला. त्यानंतर इतर शहरांमध्ये काहीच दिवसांत बाधितांची संख्या वाढली आणि नागपुरातील बाधितांची संख्या मर्यादेत राहीली. आपल्या शहरात मृत्युदर कमी असल्याचेही मुंढेंनी नमूद केले. क्वारंटाईन सेंटर आणि कोवीड केअर सेंटर बनविताना एकट्याने निर्णय घेतले नाही, तर विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, मेयो, मेडिकलचे अधिकारी सर्वांसोबत चर्चा करुनच निर्णय घेतल्याचेही त्यांनी सभागृहाला सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com