शहीद जवान भूषण सतईंना लष्करी इतमामात मानवंदना

काश्मिर खोऱ्यातील गुरेज सेक्टरमध्ये मागील शुक्रवारी पाकिस्तानने केलेल्या हल्यात भारतीय लष्कराचे चार जवान शहीद झाले होते. यामध्ये काटोल येथील भूषण रमेश सतई यांना वीरमरण आले.
Nitin Raut - Bhushan Satai
Nitin Raut - Bhushan Satai

नागपूर :  जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले काटोलचे सुपुत्र शहीद नायक भूषण सतई यांना कामठी येथील ब्रिगेड ऑफ गार्ड रेजिमेंटच्या गरुडा परेड ग्राऊंडवर अखेरची मानवंदना देण्यात आली. राज्य शासनातर्फे राज्याचे उर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शहीद भूषण सतई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. 

शहीद भूषण सतई हे मुळचे काटोलचे असून त्यांच्यावर लष्करी इतमामात काटोल नगरीत अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तर महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सैन्य विभागाच्या सब एरियाचे प्रमुख मेजर जनरल दिनेश हुड्डा यांनी अभिवादन केले. सैन्यदलाच्या विशेष पथकाकडून पारंपारिक धुन वाजवून व सशस्त्र दलातर्फे यावेळी गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी वीरपुत्राला श्रध्दांजली वाहिली. यावेळी ब्रिगेडीयर संदीप कुमार, ब्रिगेडीयर दिपक शर्मा, उपमहापौर श्रीमती मनिषा कोठे, कमांडर अलोक बेरी, आर. बी. बिराजदार यांच्यासह जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर आदीनी पुष्पचक्र अर्पण केले.

काश्मिर खोऱ्यातील गुरेज सेक्टरमध्ये मागील शुक्रवारी पाकिस्तानने केलेल्या हल्यात भारतीय लष्कराचे चार जवान शहीद झाले होते. यामध्ये काटोल येथील भूषण रमेश सतई यांना वीरमरण आले. कामठी येथील लष्करी हॉस्पिटलमधून शहीदाचे पार्थिव सेनादलाच्या गरुडा परेड येथील अमर योध्दा स्मारकाजवळ ठेवण्यात आले. यावेळी सेनादलाकडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर वीर सुपुत्राचे पार्थिव त्यांच्या मुळगावी काटोल येथे संपूर्ण सन्मानपूर्वक रवाना झाले. यावेळी शहीद सुपुत्राचे निकटवर्तिय उपस्थित होते.    

(Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com