सहा वर्षांनंतर आज मद्यपींसाठी सोनियाचा दिनू’; चंद्रपूरकरांचा घसा होणार "ओला"

दारू दुकाने, बार आणि रेस्टॉरंट यांमध्ये प्रत्यक्ष काम करणारे आणि यामुळे चालणारे इतर व्यावसायिकांमध्ये मात्र आज आनंद आहे. कारण सहा वर्षांपूर्वी एकाएकी दारूबंदी झाल्यामुळे लहानमोठ्या व्यावसायिकांची आणि त्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता.
Liquor Glass
Liquor Glass

चंद्रपूर : गेल्या सहा वर्षांपासून Since last six years मद्याच्या थेंबाथेंबाठी तरसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील chandrapur district मद्यपींना आज दिलासा मिळणार आहे. २७ मे २०२१ च्या राज्य सरकारच्या आदेशानुसार दारूविक्री आजपासून सुरू होत आहे. The sale of liquor is starting from today as per the orders of the state government जिल्ह्यातील मद्यशौकीन या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते. त्यामुळे आज मद्यपींसाठी सोनियाचा दिनू’ आहे.

चंद्रपूरकरांची प्रतीक्षा एकदाची संपली. मद्यशौकीन ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते, तो दिवस आज उजाडला. १ एप्रिल २०१५ रोजी जिल्ह्यात दारू बंद झाली होती, तर २७ मे २०२१ च्या राज्य सरकारच्या आदेशानुसार ती पुन्हा सुरू होत आहे. उत्पादन शुल्क विभागाने निलंबित केलेले दारू परवाने ३ ठिकाणाहून सिंगल विंडो पद्धतीचा वापर करत अत्यंत विद्युतगतीने पूर्ण केले. मद्य शौकिनांसाठी प्रतीक्षा असलेल्या या बाबीसाठी आज जिल्हाभरात १०० हून अधिक बार रेस्टॉरंट आणि काही दारू दुकाने खुली होणार आहेत. ६ वर्षानंतर चंद्रपुरात पुन्हा एकदा दारू विक्रीला प्रारंभ होणार आहे. 

शहरातील हॉटेल आणि बार मालकांनी आपापली प्रतिष्ठाने सज्ज केली आहेत. चंद्रपूरच्या उत्पादन शुल्क विभागाने ४९० परवानाधारकांपैकी चौकशीनंतर ९८ दारू परवाने नियमित करून मान्यता प्रदान केली. आज दुपारनंतर नागपूरहून बोलावण्यात आलेल्या दारूसाठ्यातून दारू वितरण होऊ शकणार आहे. सकाळपासून दारू विक्री सुरू झाली का, याचा अदमास घेण्यासाठी शौकिनांची हॉटेल्सपुढे घुटमळ बघायला मिळाली. 

दारूबंदी करतेवेळी जसे दोन गट पडले होते, तसेच दारूबंदी उठवताना समर्थक आणि विरोधकांचे दोन गट पडले. दारूबंदी उठविण्याला मोठा विरोध झाला. पण राज्य सरकारने कोरोनाच्या या काळात अतिशय कुशलतेने हा विषय हाताळला आणि दारूबंदी सुरू केली. राज्य सरकारचा २७ मे रोजीचा आदेश आल्यानंतर काही दिवस दारूबंदीच्या समर्थकांनी दारूबंदी उठवू नये, यासाठी प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही. शेवटी काय तर दारूबंदीच्या समर्थकांवर दारूवाल्यांची लॉबी भारी पडले, असे आज बोलले जात आहे. 

रोजगार मिळाले
दारू दुकाने, बार आणि रेस्टॉरंट यांमध्ये प्रत्यक्ष काम करणारे आणि यामुळे चालणारे इतर व्यावसायिकांमध्ये मात्र आज आनंद आहे. कारण सहा वर्षांपूर्वी एकाएकी दारूबंदी झाल्यामुळे लहानमोठ्या व्यावसायिकांची आणि त्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. आज रोजगार पुन्हा मिळाल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com