यवतमाळ जिल्ह्यातील तीन माजी मंत्र्यांनी सुरू केली आमदारकीसाठी फिल्डींग

जिल्ह्यात विधानसभेचे सात, विधान परिषदेचे पाच आमदार आहेत. कॉंग्रेसचे आमदार हरिभाऊ राठोड यांची मुदत आधीच संपली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार ख्वाजा बेग यांची राज्यपाल कोट्यातून सहा वर्षांपूर्वी निवड झाली होती. त्यांचा कार्यकाळ काल शनिवारी संपला. नवीन निवडीबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही.
Manikrao_Shivajirao_Vasantrao
Manikrao_Shivajirao_Vasantrao

यवतमाळ : राज्यपाल नामनिर्देशित आठ विधान परिषद सदस्यांची मुदत शनिवारी 6 मे रोजी संपली. तर, दोन सदस्यांची मुदत 15 जून रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या जागांवर आपली वर्णी लागावी, यासाठी जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाच्या माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे आणि वसंतराव पुरके या तीन माजी मंत्र्यांनी फिल्डींग लावणे सुरू केले आहे. त्यासाठी भ्रमणध्वनीवरून श्रेष्ठींची मनधरणी सुरू असल्याची माहिती आहे. 

राज्यसभा व विधान परिषद या दोन्ही वरिष्ठ सभागृहामंध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा व्हावा, म्हणून त्यांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे. राज्यातील विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त असलेल्या काही सदस्यांची मुदत काल शनिवार संपली आहे. त्यामुळे आता आमदारीकी मिळविण्यासाठी जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांनी प्रयत्न सुरू केले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील इच्छुक सक्रिय झाले आहेत. 

जिल्ह्यातून कॉंग्रेस पक्षाकडून विधान परिषदेवर हरिभाऊ राठोड व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांना संधी मिळाली आहे. विधानसभेत जिल्ह्यातून एकही आमदार निवडून गेलेला नाही. त्यामुळे विधान परिषदेत आपली वर्णी लागावी, यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कॉंग्रेसकडून जिल्ह्यातील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व माजी मंत्र्यांनी आमदारकीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई, दिल्लीतील नेत्यांना फोनवरून संपर्क साधला जात आहे. 

जिल्ह्यातील दोन आमदार कमी 
जिल्ह्यात विधानसभेचे सात, विधान परिषदेचे पाच आमदार आहेत. कॉंग्रेसचे आमदार हरिभाऊ राठोड यांची मुदत आधीच संपली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार ख्वाजा बेग यांची राज्यपाल कोट्यातून सहा वर्षांपूर्वी निवड झाली होती. त्यांचा कार्यकाळ काल शनिवारी संपला. नवीन निवडीबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यांची मुदत संपणार असल्याने जिल्ह्यातील विधान परिषदेतील आमदारांची संख्या दोनने कमी झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com