ठाकरेंची तिसरी पिढी असफल, असे म्हणत राणांचा मुख्यमंत्र्यांवर पुन्हा हल्लाबोल...

देशभरात मुंबईची होणारी बदनामी व मुंबई महानगर पालिकेच्या खराब प्रतिमेबद्दल आपल्याला अति दुःख होत असल्याचेसुद्धा खासदार राणा यांनी म्हटले आहे. मुंबई ही तुंबई होऊ नये, म्हणून आपण केंद्रीय स्तरावर प्रयत्न करू, असेही त्यांनी म्हटले आहे.
Navnit Rana - Uddhav Thackeray
Navnit Rana - Uddhav Thackeray

अमरावती : मुंबईतील भूमिगत गटारे, नदी स्वच्छता आणि रस्त्यांच्या कामांसाठी दरवर्षी अरबो रुपये खर्च करूनही यावेळी पुन्हा मुंबई तुंबली. महानगरपालिकेच्या नियोजनाचे पार तिनतेरा वाजले. ठाकरेंची तिसरी पिढी असफल ठरली, Thackeray's third generation fgailed असे म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा MP Navnit Rana यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा, हे दोघेही उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. काही दिवसांपूर्वी आमदार राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या दारावर मागण्याचे निवेदन चिकटवले होते. तेव्हा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. आता नवनीत राणा यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप करून पुन्हा खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘माझी मुंबई, माझी जबाबदारी’, म्हणणाऱ्या ठाकरे परिवाराचा अनागोंदी कारभार पावसाने पुन्हा चव्हाट्यावर आणला असल्याचीही टिका खासदार राणा यांनी केली आहे. 

मुंबईकरांनी दरवर्षी हा त्रास का सोसावा, असा सवाल करीत खासदार राणा राज्य सरकारच्या कामकाजाच्या पद्धतीवर बरसल्या. दरवर्षीचा अरबो रुपयांचा खर्च अशा पद्धतीने पाण्यात वाहून जाणार असेल, तर त्याची चौकशी झाली पाहिजे. कारण आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात हेच चित्र असते. त्यामुळे देशभरात मुंबईची बदनामी होते आहे आणि यासाठी केवळ ठाकरे सरकारच जबाबदार आहे. आता यापुढे असे होऊ नये, म्हणून महानगरपालिकेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही नवनीत राणा यांनी केली आहे. 

केंद्र सरकारने संसदीय समिती स्थापन करून मुंबई महानगर पालिकेच्या या अवाजवी खर्चाचे थर्ड पार्टी ऑडिट करावे, म्हणजे यातील उधळपट्टी व नेमके लाभार्थी कोण, हे बाहेर येईल. महाराष्ट्र शासनाच्या बरोबरीचे अर्थसंकल्पीय बजेट असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या या अनागोंदी कारभाराला शिवसेनाच जबाबदार असून ठाकरेंची तिसरी पिढीसुद्धा मुंबईकरांना दिलासा देण्यात अपयशी ठरल्याचा घणाघाती आरोप खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे. 

देशभरात मुंबईची होणारी बदनामी व मुंबई महानगर पालिकेच्या खराब प्रतिमेबद्दल आपल्याला अति दुःख होत असल्याचेसुद्धा खासदार राणा यांनी म्हटले आहे. मुंबई ही तुंबई होऊ नये, म्हणून आपण केंद्रीय स्तरावर प्रयत्न करू, असेही त्यांनी म्हटले आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com