‘त्यांना’ शिक्षा व्हायलाच पाहिजे, पण महिलांना नाही आवडली हेमांगी कवीची पद्धत…

त्यांनी घाणेरड्या कमेंट्स करणाऱ्यांना फटकारायलाच पाहिजे, त्याला महिलांचे समर्थनच आहे. पण त्यांनी तमाम महिलांना ज्या पद्धतीने त्यामध्ये गृहीत धरले, ते चुकीचे आहे.
Hemangi Kavi
Hemangi Kavi

नागपूर ः ‘बाई, बूब्स आणि ब्रा...’, हे मराठी अभिनेत्री हेमांगी कवी Marathi actress Hemangi Kavi यांनी जगासमोर मांडल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आणि सोशल मिडियावर Sicial Media त्याची सर्व अंगांनी चर्चा होते आहे. हेमांगीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये काहीही वावगं नाही. पण ट्रोल झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने तमाम महिलांच्या वतीने ‘जस्टीफिकेशन’ केले ते महिलांनाही आवडलेले नाही, अशी प्रतिक्रिया पंचायत राज समिती प्रशिक्षण केंद्र अमरावतीच्या प्राचार्य आणि ओडीशी नृत्यांगना शीतल मेटकर वाटाणे Sheetal Metkar Watane यांनी दिली. 

‘सरकारनामा’शी बोलताना शीतल म्हणाल्या, पोळ्या करतानाचा व्हिडिओ हेमांगीने सोशल मिडियावर शेअर केला. ती अगदी सामान्य प्रक्रिया होती. कमेंट्स स्वतःवर ओढवून घेण्याच्या त्यांचा उद्देशही त्यात दिसत नाही. पण त्यावर त्यांना ट्रोल करण्यात आले. त्यामध्ये अतिशय घाणेरड्या कमेंट्स करण्यात आल्या. त्या चुकीच्याच आहेत. त्याचे समर्थन कदापि करता येणार नाही. त्याचा विरोध करताना सोशल मिडियावर त्यांनी ‘बाई, बूब्स आणि ब्रा...’, हे जे लिहिलंय, ते कदाचित ‘हायफर’ होऊन लिहिलं असावं. त्यांनी घाणेरड्या कमेंट्स करणाऱ्यांना फटकारायलाच पाहिजे, त्याला महिलांचे समर्थनच आहे. पण त्यांनी तमाम महिलांना ज्या पद्धतीने त्यामध्ये गृहीत धरले, ते चुकीचे आहे. 

मुली, महिलांनी कोणते अंर्तवस्त्र केव्हा घालावे किंवा घालू नये, हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग असू शकतो आणि ते सर्वमान्य आहे. आज पुढारलेल्या समाजात त्यावर वेगळी चर्चा करण्याची गरज नाही. पण हेमांगीच्या ‘बाई, बूब्स आणि ब्रा...’,ने ती चर्चा घडवून आणली, ते काही रुचले नाही. हेमांगीसोबत जे झाले ते सोशल मिडियावरील छेडखानीच आहे, याबद्दल कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. पण ट्रोलर्संना फटकारताना त्यांनी फक्त त्यांचाच विरोध करायला पाहिजे होता, जस्टीफिकेशन करायला नको होते. जी गोष्ट समाजात आधीच स्वीकारली गेली आहे, स्त्रीचं वैयक्तिक स्वातंत्र्यही सर्वमान्य आहे. त्यानंतर अशा पद्धतीने सर्व महिलांना गृहीत धरून अंर्तवस्त्राच्या विषयाचा येवढा बाऊ करायला नको होता, असे शीतल म्हणाल्या. 

टायटलमुळे आला वादात...

हेमांगीने दिलेल्या त्या टायटलमुळेच त्यावर मोठी चर्चा घडून आली. खरं पाहिलं तर या विषयावर महिलांना काही बोलायचंच नव्हतं. पण हेमांगीच्या त्या पोस्टमुळे विनाकारण त्यावर चर्चा होतेय. याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणावं की नाही, हा पुन्हा दुसऱ्या चर्चेचा भाग होईल. हेमांगीनी ज्या पद्धतीने विरोध केला, त्यावर आमची नाराजी आहे, असे शीतल मेटकर वाटाणे म्हणाल्या. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com