दिलासा देण्याचे सोडून शोषण केले, अन् मग फक्त अश्रू गाळले...

पाहणीदरम्यान विदारक चित्र समोर आले. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे चिमुकल्यांचे बालपण करपले. हे सर्व दुसऱ्या लाटेत घडले. कोरोनाची दुसरी लाट धडकणार असल्याचे ऑक्टोबरमध्येच सांगण्यात आले होते.
Narendra Modi - Nana Patole
Narendra Modi - Nana Patole

यवतमाळ : कोरोनाच्या पहिल्या लाटेत केंद्र सरकारने निष्काळजीपणा केला. The central government done negligent पण त्यापासून धडा घेऊन किमान दुसऱ्या लाटेत तरी देशवासीयांचे हाल होणार नाहीत, याचा दक्षता केंद्राने घ्यायला पाहिजे होती. दुर्दैवाने तसे झाले नाही. दुसऱ्या लाटेत इंधनाचे भाव वाढवण्यात आले. In the second wave the fuel prices were increased महागाई वाढवून जनतेचे शोषण केले Exploited the people आणि त्यानंतर काय तर फक्त अश्रू गाळले, असा टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Congress President of the state Nana Patole यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. 

देशात सत्ताधारी आणि महाराष्ट्रात विरोधी पक्षाकडून समाजासमाजांत भांडणं लावून वाद निर्माण केले जात आहेत. मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्‍न जटिल केला जात आहे. मूळ विषयावर विरोधक बोलत नाहीत. अंधारात सरकार बनविणारे खरे जातीयवादी आहेत, असा प्रहार काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेत आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकार व राज्यातील विरोधकांवर सडकून टीका केली. कोरोनाच्या महामारीत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालीत. पाहणीदरम्यान विदारक चित्र समोर आले. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे चिमुकल्यांचे बालपण करपले. हे सर्व दुसऱ्या लाटेत घडले. कोरोनाची दुसरी लाट धडकणार असल्याचे ऑक्टोबरमध्येच सांगण्यात आले होते. मात्र, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली. लगेच पाच राज्याच्या निवडणुकीत पंतप्रधान दंग झाले. काही जण अश्रू काढतात, असे म्हणत पंतप्रधान मोदींचा चिमटा काढला. 

पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाचे भाव वाढत असताना केंद्र सरकार बोलायला तयार नाही. काँग्रेस पक्षाने आंदोलन करून महागाईच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले. कोरोनात लोकांच्या अंगातील रक्त काढले. अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. लोक संकटात असताना दिलासा देण्याचे सोडून महागाई वाढवून हाडातील रक्तही काढल्या जात असल्याबद्दल पटोले यांनी संताप व्यक्त केला. काँग्रेस पक्ष सत्तेत असतानाही महामारी आली. मात्र, काँग्रेसने कधी राजकारण केलं नाही. आता तर महामारीत फोटो काढण्याची स्पर्धा लागली आहे. 

संविधानाचा आत्मा न्यायव्यवस्था आहे. सत्ताकाळात काँग्रेसने कधीही सुप्रीम कोर्टाला प्रश्‍न केले नाहीत. केंद्र सरकार संविधानच संपवायला निघाल्याचे पटोले म्हणाले. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे, आमदार कुणाल पाटील, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, महिला काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी मंत्री वसंत पुरके, मध्यवर्ती बँक अध्यक्ष टिकाराम कोंगरे, किसान काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारमध्ये वाद नाही...
‘लॉक-अनलॉक’ दरम्यान राज्य सरकारमध्ये गोंधळ असल्याचे बघावयास मिळाले. याबाबत छेडले असता, महाविकास आघाडी सरकारचे काम व्यवस्थित सुरू आहे. सरकारमध्ये कुठलाही वाद नाही, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस पुन्हा उभारी घेईल...
विधानसभा अध्यक्ष असताना आपण केलेले काम जनतेने बघितले आहे. प्रदेशाध्यक्ष असतानाही उत्साह कायम आहे. काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारचे गटतट नाही. आगामी २०२४ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा आशावाद पटोले यांनी व्यक्त केला.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com