देशात राहणाऱ्या लोकांमध्ये स्पर्धा असावी, युद्ध नसावे : डॉ. मोहन भागवत

सरसंघचालकांनी जनतेला ऑनलाइन संबोधित केले. त्यांनी सुरुवातीलाच कोरोनाचा उल्लेख करून इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी स्वयंसेवकांमध्ये दसरा मेळावा करण्याची वेळ आपल्यावर आल्याचे सांगितले. यंदा संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले आहे. सर्वांनी मिळून कोरोनासोबत लढा दिला आहे. सेवाभाव जो आपला समाज विसरला होता, तो पुन्हा जागृत झाला आहे.
sangh - Dr. Mohan Bhagwat
sangh - Dr. Mohan Bhagwat

नागपूर : देशात राहणाऱ्या लोकांमध्ये स्पर्धा असावी, युद्ध नसावे. समाजात कटुता निर्माण होऊ नये, याकडे देशाने लक्ष देण्याची गरज असल्याचे, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले. २०१९ मध्ये कलम ३७० हटवण्यात आले, त्याचबरोबर ९ नोव्हेंबरला न्यायालयाने राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय दिला. तो निर्णय संपूर्ण देशाने संयमाने स्वीकारला. तसेच सीएएमुळे देशातील कोणत्याही नागरिकाला धोका नाही, असा विश्वासही डॉ. भागवत यांनी व्यक्त केला. 

चीन सातत्याने भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. विस्तावरवादी भूमिकेमुळे शेजारच्या अनेक राष्ट्रांनाही त्रास देत असल्याने युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. भविष्यातील धोके लक्षात घेता भारताला चीनपेक्षा सर्वच अर्थाने सबळ होण्याची गरज डॉ. भागवत यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काल झालेल्या विजयादशमी सोहळ्यात ते बोलत होते. कोरोना आणि फिजिकल डिस्टंन्सिंगच्या नियमामुळे यंदा प्रथमच रेशीमबाग मैदानाऐवजी सोहळा स्मृती मंदिराच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी मोजके ५० जण उपस्थित होते. 

सरसंघचालकांनी जनतेला ऑनलाइन संबोधित केले. त्यांनी सुरुवातीलाच कोरोनाचा उल्लेख करून इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी स्वयंसेवकांमध्ये दसरा मेळावा करण्याची वेळ आपल्यावर आल्याचे सांगितले. यंदा संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले आहे. सर्वांनी मिळून कोरोनासोबत लढा दिला आहे. सेवाभाव जो आपला समाज विसरला होता, तो पुन्हा जागृत झाला आहे, असे भागवत म्हणाले. 

(Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com