माझ्या दिल्ली भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही...

माझे याबाबत त्यांच्याशी बोलणे झालेले नाही. त्यांच्याशी बोलून झाल्यावर यावर प्रतिक्रिया देईन. तसेही महानगरपालिका निवडणुकीला अजून वेळ आहे. त्यासाठी आत्ताच घाई करण्याची गरज नाही.
माझ्या दिल्ली भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही...
Devendra Fadanvis Warning

नागपूर : महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Leader of Opposition Devendra Fadanvis नुकतेच दिल्लीला Delhi जाऊन आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील State president of BJP Chandrakant Patil यांनी कालच मनसेसोबत MNS युती करण्याचे सुतोवाच केले. अशा परिस्थितीत फडणवीस यांच्या दिल्ली वारीला विशेष महत्व प्राप्त होत आहे आणि निरनिराळ्‍या चर्चादेखील होत आहेत. याबाबत फडणवीस यांना विचारले असता, ‘माझ्या दिल्ली भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही...’, असे ते म्हणाले. Tthere is no need to make political sense of my visit to delhi.

आज सकाळी नागपुरात आले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, जे नवीन मंत्री झालेत, त्यांची काल दिल्लीला भेट घेतली आणि आणखी काही कामं होती, त्यासाठी दिल्लीला गेलो होतो. केंद्र सरकारकडे आपली विविध कामे असतात, त्यासाठी अधून मधून जावं लागतं. या दिल्ली भेटीचा कुठलाही राजकीय अर्थ लावण्याचं काही कारण नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी परप्रांतीयांचा मुद्दा सोडला, तर मनसेसोबत आमची युती होऊ शकते, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने त्यांचे हे विधान महत्त्वाचं मानले जात आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, अजून या सर्व गोष्टींना वेळ आहे. याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल.

नेहमीच असं पाहण्यात येतं की, चंद्रकांत दादांचं म्हणणं पूर्णपणे समजून घेतलं जात नाही. बरेचदा अर्धवट माहितीच्या आधारे बातम्या पसरवल्या जातात. त्यामुळे सर्वत्र संभ्रम निर्माण होतो. राहिलं कालचं विधान, तर ते त्यांनी अभ्यासपूर्णच केले असेल. माझे याबाबत त्यांच्याशी बोलणे झालेले नाही. त्यांच्याशी बोलून झाल्यावर यावर प्रतिक्रिया देईन. तसेही महानगरपालिका निवडणुकीला अजून वेळ आहे. त्यासाठी आत्ताच घाई करण्याची गरज नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in