महाराष्ट्राच्या इतिहासात अशी मुस्कटदाबी कधीही झाली नाही : प्रवीण दरेकर - there has never been such a pressure in the history the history of maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

महाराष्ट्राच्या इतिहासात अशी मुस्कटदाबी कधीही झाली नाही : प्रवीण दरेकर

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 6 जुलै 2021

विधानसभेमध्ये आज १०६ पैकी एकही आमदार उपस्थित नाही. मग चर्चा कसली. ही मनमानी नाही तर काय आहे? जनतेच्या मनात सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे. ती आता सुधारणे नाही.

नागपूर : काल विधानसभेमध्ये १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. Suspension of 12 MLA's in the house त्यानंतर आज प्रतिविधानसभा आयोजित करून कालच्या घटनेचा निषेध करीत असताना अक्षरशः मार्शल पाठवून राज्याचे माजी मुख्यमंत्री Former Minister आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हाकलण्यात आले. ही मुस्कटदाबी आहे. महाराष्ट्रात यापूर्वी अशी मुस्कटदाबी कधीही झाली नाही, असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर Pravin Darekar आज म्हणाले. 

दरेकर म्हणाले, काल झालेल्या प्रकाराची निंदा करत असताना आज जो प्रकार झाला, तो निषेर्धार्ह आहे. कायद्यानुसार कारवाई करावी, त्याला आमची मनाई नाही. पण दंडेलशाही करून हुसकावून लावणे योग्य नाही. देवेंद्र फडणवीस पाच वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांना संविधान, लोकशाही आणि कायदेशीर बाबींची माहिती आहे. तरीही त्यांना प्रतिविधानसभा भरवावी लागली. असे का करावे लागले, याचा विचार झाला पाहिजे. कारण टोकाची मुस्कटदाबी झाल्यामुळे त्यांना असे पाऊल उचलावे लागले. कालपासून आजपर्यंत झालेल्या सर्व प्रकारांची चौकशी झाली पाहिजे. जेणेकरून महाराष्ट्राला खरे काय ते कळले पाहिजे आणि दूध का दूध पानी का पानी’ झाले पाहिजे.  

आमची सुरूवातच आंदोलनातून…
अधिवेशन चालविण्यासाठी रोज लाखो रुपये खर्च केले जातात. हा जनतेचा पैसा आहे, पण कालपासून सुरू असलेल्या प्रकारांमुळे कष्टकरी जनतेचा पैसा वाया जात आहे. मी खालच्याही सभागृहात काम केले आहे. आंदोलने केली आहेत. आमची सुरूवातच आंदोलनांतून झाली आहे. पण असा प्रकार मी कधीही पाहिलेला नाही. कारण आज विधानसभेत विरोधी पक्ष नाही. त्यामुळे सभागृहात झालेल्या चर्चेला काही अर्थ राहणार नाही. राज्यासाठी सरकारप्रमाणेच विरोधी पक्षही महत्वाचा आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हाकलून लावण्याच्या घटनेचा निषेध करतो, असे प्रवीण दरेकर म्हणाले. 

हेही वाचा : १२ आमदारांचे निलंबन मागे न घेतल्यास महाराष्ट्रभर आंदोलन पेटवू

विधानसभेमध्ये आज १०६ पैकी एकही आमदार उपस्थित नाही. मग चर्चा कसली. ही मनमानी नाही तर काय आहे? जनतेच्या मनात सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे. ती आता सुधारणे नाही. निलंबनाच्या प्रकाराची निंदा केली तेवढी कमी आहे. हे राजकीय अभिनिवेशातून केले गेले आहे. एकमेकांचा सूड घेण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. विधिमंडळाच्या आजवरच्या परंपरेला शोभणारे नाही. कोविडच्या काळात मेळावे घेतले जात आहे. अशा वेळी दुसऱ्यांना ज्ञान सांगणे योग्य नाही. विधानसभेत लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केला. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख