रेमडेसिव्हिर पाठोपाठ रक्त पातळ करणाऱ्या इनोक्स्यापॅरिन इंजेक्शनचाही तुटवडा... - there is also shortage of inoxaparin injections followed by remedisivior | Politics Marathi News - Sarkarnama

रेमडेसिव्हिर पाठोपाठ रक्त पातळ करणाऱ्या इनोक्स्यापॅरिन इंजेक्शनचाही तुटवडा...

केवल जीवनतारे
गुरुवार, 6 मे 2021

काही औषधांच्या जास्त डोजमुळे कोरोना रुग्णांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत असल्याचे पुढे आले. यामुळे बाधितांना ह्रदयविकाराचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे रक्त पातळ करण्यासाठी मेडिकलमध्ये डॉक्टरांकडून ‘इनोक्स्यापॅरिन’ हे इंजेक्शन लावण्यात येत होते.

नागपूर : कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. त्यातच ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा भासू लागला.  (shortage of oxygen and remedial injections) त्यानंतर याचा काळाबाजार सुरू झाला. आता रक्त पातळ करणाऱ्या इनोक्स्यापॅरिन या इंजेक्शनचाही तुटवडा झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रेमडेसिव्हिरसारखी बोंबाबोंब होऊ नये म्हणून, डॉक्टर रुग्णांच्या प्रीस्क्रिप्शनवरही हे इंजेक्शन लिहून देत नाहीयेत. (doctors do not prescribe these injections) कोरोनापुढे यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र आहे. 

गेल्या १५ दिवसांपासून हे इंजेक्शन एकाही रुग्णाला लावण्यात आलेले नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यात मागील महिनाभर कोरोनाचा कहर होता. दररोजच्या बाधितांची संख्या सात हजारांवर पोहोचली होती. आरटीपीसीआर या कोरोना चाचणीपासून तर एचआरसीटी काढण्यासाठी रुग्णांची तोबा गर्दी होती. कोरोनाबाधितांची संख्या अचानक वाढल्याने मेयो, मेडिकल किंवा एम्समध्ये खाट मिळणे दुरापास्त झाले होते. औषधांचीही कमतरता जाणवू लागली. रेमडेसिव्हिर कोरोनासाठी जीवनरक्षक नाही. हे सर्वांना माहिती आहे. मात्र काही प्रमाणात का होईना लाभ होतो. यामुळे बाधितांचे जीव वाचवण्यासाठी रेमडेसिव्हिर खरेदीसाठी काळाबाजार सुरू झाला. जास्त डोजमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची समस्या जाणवू लागली. यामुळे रक्त पातळ करण्यासाठी ‘इनोक्स्यापॅरिन’ हे इंजेक्शन लावण्यात येत होते. गरज असलेल्या बहुतांश रुग्णांना हे इंजेक्शन दिले जात होते. मात्र पंधरा दिवसांपासून या इंजेक्शनचा तुटवडा आहे. हे इंजेक्शन खरेदी करण्यासाठी प्रशासनाने अद्याप आदेश दिलेले नाही. मेडिकल प्रशासनानेदेखील यावर चुप्पी साधली आहे. 

सध्या मेडिकलमध्ये ७०० कोरोनाबाधित (700 coronary) उपचार घेत आहेत. यांपैकी दीडशेहून अधिक व्यक्ती व्हेंटिलेटरवर आहेत. (More than 150 of these people) त्यांना ‘इनोक्स्यापॅरिन’ इंजेक्शनची गरज आहे. मात्र, हे इंजेक्शन खरेदी विभागाने खरेदीच केले नाही. इंजेक्शन मिळत नसेल तर ‘डॉलटेपॅरिन’ हे पर्यायी इंजेक्शन आहे, मात्र तेसुद्धा मेडिकलच्या औषधालयात नसल्याची माहिती आहे. दररोज मेडिकलमध्ये सुमारे पन्नासपेक्षा अधिक रुग्णांना हे इंजेक्शन लावण्यात येत होते. मात्र आता इंजेक्शनचा साठा संपल्याने कुणालाच इंजेक्शन लावण्यात येत नाही. हीच स्थिती मेयोची असल्याचे सूत्रांनी सांगितले. (same situation was with Mayo) यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी प्रशासनाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. 

रक्त पातळ करणाऱ्या ‘इनोक्स्यापॅरिन’ इंजेक्शनची तसेच वॉर्डावॉर्डात व्हेंटिलेटर किंवा मोबाईल व्हेंटिलेटरऐवजी बायपॅक मशीनची मोठ्या प्रमाणात गरज आहे. ही अत्यावश्यक साधनसामुग्री खरेदी करण्याचे सोडून मेडिकल प्रशासनाने मोबाईल व्हेंटिलेटर खरेदीवर भर दिला आहे. आवश्यक असलेले ‘इनोक्स्यापॅरिन’ इंजेक्शन मेडिकल प्रशासनाने तत्काळ खरेदी करावे. यासंदर्भातील निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना देण्यात येणार आहे. 
-सिद्धांत पाटील, संयोजक, समता सैनिक दल, नागपूर. 

हेही वाचा : खबरदार, अशास्त्रीय माहिती पसरवू नका! 'एम्स'च्या प्रमुखांना 'आयआरआयए'चा इशारा

काय आहे इनोक्स्यापॅरिन 
काही औषधांच्या जास्त डोजमुळे कोरोना रुग्णांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत असल्याचे पुढे आले. यामुळे बाधितांना ह्रदयविकाराचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे रक्त पातळ करण्यासाठी मेडिकलमध्ये डॉक्टरांकडून ‘इनोक्स्यापॅरिन’ हे इंजेक्शन लावण्यात येत होते.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख