मग कॉंग्रेसने का म्हटलं होतं की, बाजार समिती रद्द करू..

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आजचे आंदोलन म्हणजे केवळ नाटकबाजी आहे. ‘बहती गंगा मे हाथ धोना’, असा प्रयत्न सुरू आहे, तो यशस्वी होणार नाही. यांना शेतकऱ्यांविषयी थोडीही आपुलकी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा त्यांना कुठलाही पाठिंबा नाही.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis

नागपूर : महाराष्ट्रात कृषी विधेयक येऊन इतके दिवस झाले. पण आजपर्यंत कोणतेही आंदोलन झाले नाही. आता काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करत आहेत. शेतकऱ्यांना भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावरील आंदोलनात मंचावर जे नेते बसले आहेत, त्यांनी २०१९ च्या जाहीरनाम्यात ‘आम्ही निवडून आलो तर बाजार समिती हे रद्द करू, असं का म्हटलं होतं, याचं उत्तर द्यावं, असे राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

फडणवीस म्हणाले, कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते की, कृषी उत्पन्न बाजार समिती रद्द करा. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता उत्तर द्यावे की, २००६ मध्ये कंत्राटी शेतीचा कायदा त्यांनी महाराष्ट्रात का मंजूर केला. २००६ पासून २०२० पर्यंत तो कायदा महाराष्ट्रात चालू आहे. महाराष्ट्रातला कायदा त्यांना चालतो आणि देशातला कायदा का चालत नाही, ही ढोंगबाजी कशासाठी? महाराष्ट्रात थेट खरेदी करण्याचे २९ परवाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात देण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर कॉर्पोरेटला थेट खरेदी करण्याची मंजुरी कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीने दिली. पण सध्या केंद्र सरकार तेही देत नाहीये. 

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आजचे आंदोलन म्हणजे केवळ नाटकबाजी आहे. ‘बहती गंगा मे हाथ धोना’, असा प्रयत्न सुरू आहे, तो यशस्वी होणार नाही. यांना शेतकऱ्यांविषयी थोडीही आपुलकी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा त्यांना कुठलाही पाठिंबा नाही. उलट शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने या तिन्ही कायद्यांचे स्वागत केलेले आहे. त्यांनी सांगितले की, शेतकरी हिताचे हे तिन्ही कायदे आहेत, असे फडणवीस म्हणाले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com