पोलिसांच्या मारहाणीत ठवकरचा मृत्यू : पीएसआयसह तीन पोलिस निलंबित..

आमदार कृष्णा खोपडे यांनी मनोज ठवकर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्री ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे यांना निवेदन दिले. आमदार खोपडे यांच्या पाठपुराव्यामुळे सीआयडी चौकशी होईपर्यंत दोषी पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
Police Cartoon
Police Cartoon

नागपूर : पारडी नाक्यावर पोलिसांच्या नाकाबंदीदरम्यान गाडी न थांबवल्याच्या कारणावरून पोलिसांनी दिव्यांग मनोज ठवकरला Manoj Thawkar जबर मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिस आयुक्त अमितेश कुमार Police Commissioner Amitesh Kumar यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन पीएसआयसह तिघांना निलंबित केले. Suspended three policemen पीएसआय मुकेश ढोबळे, एनपीसी नामदेव चरडे आणि कॉंस्टेबल आशिष शहाणे अशी निलंबितांची नावे आहेत. पोलिस कस्टडीत झालेल्या मनोज ठवकर हत्याकांडाचा तपास सीआयडी CID करीत आहे. 

सात जुलैला रात्री ८ वाजताच्या सुमारास पारडी चौकात पोलिस नाकाबंदीदरम्यान मनोज मोपेडेने जात होता. पोलिस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे यांनी मनोज याला मोपेड थांबविण्याचा इशारा केला. त्याने न थांबता वेग वाढवला. पीएसआयने मोपेडचे मागील करिअर पकडले. मनोजने काही अंतर काही पीएसआयला फरफटत नेले. पीएसआयने दोन पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावले आणि बाईकने त्याचा पाठलाग केला. मनोजला काही अंतरावर पकडले आणि तिघांनीही मनोजला जबर मारहाण केली. मनोज हा दिव्यांग असल्याचे पोलिसांना ओरडून सांगत होता. परंतु पोलिस त्याला मार देत होते. 

पोलिसांनी मनोजला पोलिस स्टेशनमध्ये नेले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. जवळपास दीड तास रक्तबंबाळ झालेला मनोज पोलिस ठाण्यात बसून होता. त्याला मारहाण झाल्यामुळे श्‍वास घेण्यास त्रास होत होता. काही वेळातच तो खाली कोसळला. पोलिसांनी त्याला भवानी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी मनोज ठवकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. तसेच दोन लाख रुपयांची मदतही मनोजच्या कुटुंबीयांना केली. 
 

तर वाचला असता जीव 
दिव्यांग मनोज ठवकर याला पोलिसांनी जबर मारहाण केली आणि पोलिस ठाण्यात आणले. मनोजला मुका मार लागल्यामुळे तो विव्हळत असल्याचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीत दिसत आहे. जर पोलिसांनी त्याला वेळेवर उपचारासाठी नेले असते तर मनोजचा जीव वाचला असता. परंतु, धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी मनोजच्या जिवाची पर्वा न करता त्याला पोलिस ठाण्यात दीड तास बसवून ठेवले होते. 

केंद्रीय मंत्री गडकरींनी केले सांत्वन..
केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी पोलिस मारहाणीत मृत्यू पावलेल्या मनोज ठवकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करताना मनोज ठवकर यांच्या पत्नीला नोकरी देण्यासंदर्भात शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. तोंडाला मास्क न लावल्याच्या कारणावरून पोलिस मारहाणीत मनोज ठवकर यांचा मृत्यू झाला होता. आमदार कृष्णा खोपडे यांनी मनोज ठवकर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्री ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे यांना निवेदन दिले. आमदार खोपडे यांच्या पाठपुराव्यामुळे सीआयडी चौकशी होईपर्यंत दोषी पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

शहर भाजपनेही ठवकर कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचा धनादेश दिला. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या समवेत यावेळी आमदार कृष्णा खोपडे, संजय अवचट, नगरसेवक दीपक वाडीभस्मे, जयश्री रारोकर, मनोज चापले तसेच पांडुरंग मेहर, देवेंद्र मेहर, योगेश रारोकर, गंगाधर लेंडे, राजेश झाडे, संजय मानकर, राजू दिवटे, कपिल लेंडे, रितेश राठे, प्रमोद पेंडके, वैशाली वैद्य आदी उपस्थित होते. ज्येष्ठ स्वयंसेवक सत्यवान रारोकर यांचे नुकतेच कोविडमुळे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचेही गडकरी यांनी सांत्वन केले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com