येवढंच सांगा की, तुम्ही हा खर्च खिशातून केलात की सरकारी तिजोरीतून ?

या ऐशआरामात अजून काही कसर बाकी असल्यामुळे गोर-गरीब शेतकरी आणि सामान्यांची वीज तोडण्याची जोरदार मोहीम राज्यात सगळीकडे सुरू असावी, अशीही टिका डाॅ. राऊत यांच्यावरकरण्यात येत आहे.
Atul Bhatkhalkar - Nitin Raut
Atul Bhatkhalkar - Nitin Raut

नागपूर : मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता शासकीय विमानाचा खासगी कामासाठी वापर करणारे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आधीच अडचणीत आले आहेत. त्यातच स्वतःचे घर आणि कार्यालय यांवर वारेमाप खर्च केल्याचा आरोप काल भाजपने त्यांच्यावर केला. त्यावर ‘मी पायलट होतो. त्यावेळी मी खर्च करू शकत असल्याने लॅविश रहायचो.’, असं उर्जामंत्री राऊत म्हणाले. हरकत नाही, पण आत्ता हा करोडोंचा खर्च तुम्ही खिशातून केलात की सरकारी तिजोरीतून केलात एवढंच सांगा, असा प्रश्‍न भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. 

महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी विरोधी पक्षाची मंडळी सोडत नाहीये. आधी संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षाने सरकारला भंडावून सोडले. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन सचिन वाझेंच्या मुद्यावर तापवण्यात आले. अधिवेशन संपल्यानंतर याच प्रकरणात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हेसुद्धा अडचणीत आले. त्यानंतर परवा परवा भाजपचे मीडिया विभागाचे प्रमुख विश्‍वास पाठक यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याविरोधात शासकीय विमानाचा वापर खासगी कामासाठी केल्याची तक्रार मुंबईतील निर्मल नगर पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर डॉ. राऊत यांच्यावर राज्यभरातून टिका होऊ लागली. त्यावर उत्तर देताना ‘मी पायलट होतो. त्यावेळी मी खर्च करू शकत असल्याने लॅविश रहायचो.’, असं ते म्हणाले. त्यावर हरकत नाही, पण आता बंगल्यावर करोडोंचा खर्च कुठून केला, असा प्रश्‍न आमदार भातखळकर यांनी केला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष आता ऊर्जामंत्र्यांच्या मागे लागलाय, असे बोलले जात आहे.

आमची तिजोरी रिकामी आहे, अशी बोंबाबोंब करणाऱ्या सरकारचे मंत्री मात्र आपल्या ऐशआरामावर पैशांची वारेमाप उधळपट्टी करत आहेत, असे ट्विट भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून काल केले. सोबत डॉ. राऊत यांचे आलिशान घर आणि कार्यालयाचे फोटोदेखील शेअर केले होते. या ऐशआरामात अजून काही कसर बाकी असल्यामुळे गोर-गरीब शेतकरी आणि सामान्यांची वीज तोडण्याची जोरदार मोहीम राज्यात सगळीकडे सुरू असावी, अशीही टिका त्यांच्यावर करण्यात येत आहे. 

सध्यातरी आमदार भातखळकर यांच्या ट्विटला डॉ. राऊत यांनी उत्तर दिलेले नाही. पण ऊर्जामंत्र्यांवर सतत टिका होत असल्याने राज्य सरकारला अडचणीत आणणारे आणखी एक मंत्री, अशा दृष्टीने त्यांच्याकडे बघितले जात आहे. आता हे प्रकरण कोणते वळण घेणार, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com