त्यांच्या डोळ्यांतील अश्रू आमच्याही डोळ्यांतूनही पडतात : विजय वडेट्टीवार 

पायलटचे कमर्शीअल प्रशिक्षण देणाऱ्या कंपन्यांसोबत करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या आठवडाभरात हा करार होणार आहे. बहुजनांची मुले पायलट म्हणून तेथे गेली पाहिजेत, असा महाज्योतीचा प्रयत्न आहे.
Vijay Wadettiwar at mahajyoti
Vijay Wadettiwar at mahajyoti

नागपूर : बहुजन समाजातील लोकांची त्यांच्या मुलांची परिस्थिती फार नाजूक आहे. तरीदेखील काही लोक आमच्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ओबीसीमध्ये भटक्या जमाती, बंजारा, नाथजोगी, वडार अशा अनेक जाती आहेत. यांमधील काही वर्षानुवर्षांपासून पालांमध्ये राहात आहेत. या समाजाच्या वेदना आम्हाला कळतात. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू आमच्याही डोळ्यांतून पडतात. महाज्योतीच्या माध्यमातून बहुजन विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर केले जाणार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सागितले.

ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांनी पदवी, पदविका आणि पीएचडीच्या मागे न लागता जेईईई, नीट, स्पर्धा परीक्षा, युपीएससी, एमपीएससी, पोलिस प्रशिक्षण यांकडे लक्ष केंद्रीत केले पाहीजे. ओबीसी विद्यार्थी कमर्शीअल पायलट झाले पाहिजे, यासाठी आता ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पायलटचे कमर्शीअल प्रशिक्षण देणाऱ्या कंपन्यांसोबत करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या आठवडाभरात हा करार होणार आहे. बहुजनांची मुले पायलट म्हणून तेथे गेली पाहिजेत, असा महाज्योतीचा प्रयत्न आहे. सीए आणि बॅंकांच्या परीक्षांमध्येही बहुजन विद्यार्थ्यांना प्रयत्न करावे, अशी महाज्योतीची इच्छा आहे. 

पीएचडीसाठी यावर्षी आम्ही २०० विद्यार्थी घेण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात ही संख्या वाढवता येईल. पण सध्या २०० विद्यार्थ्यांठी जाहिरात काढली जाणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. व्हीजेएनटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७४० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांना स्कॉलरशीपचे पैसे मिळण्यासाठी ऊशीर झाला. यामध्ये ट्रेझरीकडून काही समस्या निर्णाण झाल्या होत्या. कारण मागच्या सरकारने खासगी बॅंकेमध्ये पैसे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता आमच्या सरकारने राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये पैसे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पैसे वळते होण्यास वेळ लागला. परंतु आता व्हीजेएनटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉपरशीप लवकरात लवकर वितरीत करण्यात येणार आहे. ओबीसी विभागातर्फे ६०५ अभ्यासक्रमांना स्कॉपलशीप दिली जाते. यामध्ये आता वाढ करून एमएससी आणि कॉम्प्युटर सायन्सचा समावेळ पुढील सत्रापासून करण्यात येणार आहे, असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com