तळोजा कारागृहाने अरुण गवळीला प्रवेश नाकारला, दिला होम क्वारंटाईनचा सल्ला 

पॅरोल रजेमध्ये वाढ मिळावी म्हणून दुसऱ्यांदा अर्ज करणाऱ्या गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. 24 मे रोजी त्याची पॅरोल रजा संपल्याने उच्च न्यायालायच्या आदेशानुसार तो तळोजा कारागृहामध्ये शरण गेला होता.
Arun Gawali
Arun Gawali

नागपूर : पॅरोल रजा संपल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुंबईतील तळोजा कारागृह प्रशासनासमोर शरण गेलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला कारागृह प्रशासनाने प्रवेश नाकारला. कारागृहातील इतर कैद्यांना कोरोना आजाराचा संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेता, गवळीला होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला तळोजा कारागृह प्रशासनाने दिला, अशी माहिती अरुण गवळीचे वकील मीर नगमान अली यांनी दिली. 

पॅरोल रजेमध्ये वाढ मिळावी म्हणून दुसऱ्यांदा अर्ज करणाऱ्या गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. 24 मे रोजी त्याची पॅरोल रजा संपल्याने उच्च न्यायालायच्या आदेशानुसार तो तळोजा कारागृहामध्ये शरण गेला होता. त्यामुळे, रजा वाढवून मिळावी, म्हणून 29 मे रोजी गवळी पुन्हा उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती ऍड. मीर नगमान अली यांनी दिली. पत्नी आजारी असल्याने 13 मार्च रोजी अरुण गवळी याला 45 दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर, लॉकडाऊन लागू झाल्याने 28 एप्रिल रोजी त्याला 10 मे पर्यंत पुन्हा पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती. 

दरम्यान, लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने त्याने 8 मे रोजी रजा वाढवून मिळावी, या विनंतीसह न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल केला होता. त्यानुसार, 24 मे पर्यंत पॅरोल रजा वाढवून देण्यात आली होती. ही रजा संपत आल्याने गवळी याने गुरुवारी (ता. 21) तिसऱ्यांदा पॅरोलसाठी अर्ज केला होता. मात्र, त्याचा हा विनंती अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळत त्याला मुंबई येथील तळोजा कारागृह प्रशासनाकडे शरण येण्याचे आदेश दिले होते. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला 20 मे 2008 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानुसार, तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com