पंतप्रधानांकडे १२ विषय नेऊन मुख्यमंत्र्यांनी महत्वाच्या विषयांचे १२ वाजवले...

महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये ज्या मराठ्यांचं मोलाचं योगदान आहे, त्यांच्यावर अन्याय होतो आहे, याकडे महाविकास आघाडी सरकारने लक्ष दिले पाहिजे. जेव्हा मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटायला गेले, तेव्हा काही व्यक्तिगत विषयांवरही त्यांनी भेट मागितली असण्याची शक्यता आहे.
Modi - Mungantiwar - Uddhav
Modi - Mungantiwar - Uddhav

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे the Chief Minister Uddhav Thackeray आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या भेटीतून अपेक्षा होती की महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मराठा आरक्षण व ओबीसी समाजावर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत गंभीरपणे चर्चा करतील. पण गंभीरपणे चर्चा करण्याऐवजी १२ विषय घेऊन ते पंतप्रधानांकडे गेले taking twelve subjects to the Prime Minister आणि आरक्षणाच्या महत्वाच्या विषयाचे १२ वाजवण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या दृष्टीने मराठा आरक्षण व १२ आमदारांची नियुक्ती याच्यामध्ये काही फरक आहे की नाही, असा खोचक सवाल करीत राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार Former Finance Minister Sudhir Mungantiwar यांनी आज उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

‘सरकारनामा’शी बोलताना श्री मुनगंटीवार म्हणाले, आजच्या चर्चेत मुख्यमंत्र्यांच्या चर्चेचा महत्वाचा विषय म्हणजे १२ आमदारांची नियुक्ती. हा काही राज्यातील जनतेसाठी महत्वाचा विषय आहे का? १२ आमदारांच्या नियुक्तीने राज्याचा जीडीपी वाढणार आहे की देशाचा जीडीपी वाढणार आहे? त्या १२ आमदारांची नियुक्ती पुढे २ हजार वर्ष जरी झाली नाही, तरी काही बिघडणार नाही. पण महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये ज्या मराठ्यांचं मोलाचं योगदान आहे, त्यांच्यावर अन्याय होतो आहे, याकडे महाविकास आघाडी सरकारने लक्ष दिले पाहिजे. जेव्हा मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटायला गेले, तेव्हा काही व्यक्तिगत विषयांवरही त्यांनी भेट मागितली असण्याची शक्यता आहे. भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे मी सांगू नाही शकत. पण ते १२ विषय घेऊन गेल्याची माहिती मिळाली. त्यांनी १ किंवा फारच फार २ विषय घेऊन पंतप्रधानांकडे जायला पाहिजे होते. इतके विषय घेऊन गेल्यामुळे त्या भेटीतले गांभीर्यच निघून गेले. 

५ जुलैला होणारे अधिवेशनच आता होणार नाहीये, अशी माहिती आहे. त्यामुळे आमदारांची नियुक्ती झाली काय आणि नाही झाली काय, त्याचा काहीही फरक पडणार नाही. योग्य पद्धतीने दर्जेदार चर्चा व्हावी, म्हणून अधिवेशन होतं. पण सरकारला आता आमचा सामना करण्याची भिती वाटते आहे. त्यामुळे विदर्भासाठी होणारे नागपुरातील हिवाळी अधिवेशनही होते का नाही, हेसुद्धा सांगता येत नाही. कोरोनाची लढाई एकमात्र विषय महत्वाचा आहे, पण त्याकडे सरकारचे लक्ष नाही. सरकार कोणत्याच विषयावर गंभीर नाही. आरोग्य, प्रत्येक जिल्ह्याची ब्ल्यू प्रिंट तयार करणे आदी कामे सरकारने हाती घेतली पाहिजे, पण यांचे मात्र भलतेच सुरू आहे, असा घणाघात मुनगंटीवार यांनी केला. 

आता केंद्र सरकार देशभरात लसीकरण करणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच लसीकरणाचे ६ हजार ५०० कोटी वाचले. ते पैसे आरोग्य विभागाला द्यायला पाहिजे. पण सरकार ते पैसैही द्यायला तयार नाही. ४ मे २०२० ला आरोग्य विभागाची भरती करण्याचा जीआर निघाला. होणार होती, तीसुद्धा नाही झाली. हाफकिनच्या माध्यमातून काय करायचे होते, तेसुद्धा थंडबस्त्यात गेले. त्यामुळे या सरकारला लोकांचे विषय थंड होऊ द्यायचे असतात, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com