निराशेच्या गर्तेत जाणाऱ्या समाजाला बाहेर काढावे लागेल : नितीन गडकरी

देशात बाजारपेठ मोठी आहे. पाणी, ऊर्जा, दळणवळणाची विविध साधने आणि संवाद माध्यमे आपल्याकडे उपलब्ध आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण झाले आहे. पुरेशी वीज आहे, जैविक तंत्रज्ञानाचा विकास होतो आहे, याचा अर्थ आम्ही योग्य दिशेने जात आहोत,
Nitin Gadkari
Nitin Gadkari

नागपूर : कोरोनाने जगासमोर मोठे संकट उभे केले आहे. भय आणि निराशेच्या गर्तेत जाणाऱ्या समाजाला बाहेर काढून सकारात्मकता व आत्मविश्वास प्रस्थापित करण्याचे राष्ट्रीय काम आपले आहे. त्यासाठी नवीन संशोधन, उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योगांचा विकास करण्यास तसेच आयातीत वस्तूंसाठी पर्याय निर्माण करून आयात कमी करून निर्यात वाढविणे, अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे, असे मत केंद्रीय रस्ते, महामार्ग, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. 

पंजाब-हरयाणा विद्यापीठाच्या प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांशी गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. यावेळी प्रख्यात व्याख्याते मुकुल कानिटकर व राजकुमारजी उपस्थित होते. कोविडमुळे संपूर्ण जगासमोर संकट निर्माण झाले आहे. सर्वच क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेसमोर एक आव्हान निर्माण झाले आहे. भय, निराशेच्या गर्तेत जाणाऱ्या समाजाला बाहेर काढून सकारात्मकता व आत्मविश्वास प्रस्थापित करण्याचे राष्ट्रीय काम आपले आहे. संकटांवर मात करीत पुढे जाण्याचा आमचा इतिहास आहे. ‘राष्ट्र विजयी हो हमारा’ या पध्दतीनेच आपण संकटांचा सामना केला. या संकटामुळे निर्माण झालेली आर्थिक लढाईही आम्ही जिंकूच हा विश्वासही त्यांनी व्यत केला. 

गडकरी म्हणाले, बेरोजगारी आहे म्हणून गरिबी आहे. योग्य दृष्टिकोन असेल व योग्य नीती असेल तर हा देश आर्थिक ताकद बनू शकतो. उद्देश निश्चित असेल तर मार्गही निश्चित असला पाहिजे. आमची क्षमता काय आहे, आमच्यात कमतरता कोणत्या आहेत, या जाणून घेतल्या पाहिजेत. लोकसंख्या अधिक आहे. देशात बाजारपेठ मोठी आहे. पाणी, ऊर्जा, दळणवळणाची विविध साधने आणि संवाद माध्यमे आपल्याकडे उपलब्ध आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण झाले आहे. पुरेशी वीज आहे, जैविक तंत्रज्ञानाचा विकास होतो आहे, याचा अर्थ आम्ही योग्य दिशेने जात आहोत, असेही गडकरी म्हणाले.       (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com