बजरंग दलाची तुलना तालिबानसोबत करणाऱ्या जावेद अख्तरवर कारवाई करा...

सर्व घटना हिंदू समाजाला आक्रोशीत करणाऱ्या असून समाजाला भ्रमीत करण्याचे सुनियोजित कारस्थान आहे. या विरोधात विहिंप जनजागरण करीत असून आवश्यकता पडल्यास आंदोलनही करणार.
बजरंग दलाची तुलना तालिबानसोबत करणाऱ्या जावेद अख्तरवर कारवाई करा...
Javed Akhtar

नागपूर : जावेद अख्तर Javed Akhtar यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, RSS विश्व हिंदू परिषद व बजरंगदलाची तुलना तालिबानसोबत केली. त्यांचे हे वक्तव्य पूर्वग्रह दूषित आणि अज्ञानमूलक आणि समाजामध्ये भ्रम पसरवणारे आहे. त्यांच्या वक्तव्याने धार्मिक सौहार्द बिघडू शकते. त्यामुळे असले वक्तव्य करणाऱ्या अख्तर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिन्द परांडे यांनी पत्रकार परिषदेत केली. Milind Parande's demand in Press conference. 

परांडे म्हणाले, तालिबान म्हणजे इस्लामिक शासनाचा क्रूर चेहरा आहे. शरीया कायद्यावर चालणाऱ्या देशात प्रगती व स्थैर्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. गीतकार, कवी, लेखक अशी ओळख असलेल्या जावेद अख्तर यांनी आपले पद व प्रतिष्ठेचा गैरउपयोग करीत बजरंगदल, विश्व हिंदू परिषद व रा. स्व. संघाबद्दल अत्यंत चुकीचे आणि भ्रामक वक्तव्य केले आहे. असे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या जावेद अख्तर यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिन्द परांडे यांनी येथे पत्र परिषदेत केली. पण कोणासोबत राहायचे आणि आपला संबंध कोणाशी जोडायचा, याचा विचार आता भारतीय मुस्लिमांनी करायला हवा. एका जावेद अख्तरच्या मूर्खपणामुळे संपूर्ण मुस्लिम समाज आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहात आहे. अशा लोकांचे नेतृत्व मुस्लिम समाजानेच काढून घेतले पाहिजे. तालीबान्यांचे समर्थन करणाऱ्या मुस्लिमांनी याचा जरूर विचार करावा, असे परांडे म्हणाले.    

हिजाब प्रकरणी कारवाई हवी
नागपुरात हिजाब दिवसानिमित्त घडलेला प्रकार तालिबानी मानसिकतेचे प्रदर्शन करणारा आहे. हिंदू तरुणींना फूस लावून जबरदस्ती बुरखा घालण्याचा प्रकार स्त्री स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. त्या विरोधात विहिंपने तक्रार केली असता दोषींवर कारवाई न करता माफीनामा स्वीकारणे म्हणजे सारवासारव करणे आहे. संख्या कमी असली की माफी मागणे आणि संख्या वाढताच शिरजोर होणे, ही मुस्लिम मानसिकता आहे. हे लक्षात घेता हिजाब प्रकरणी केवळ माफीनाम्यावर न सोडता संबंधितांवर कठोर कारवाई होऊन खटला दाखल केला पाहिजे, असे परांडे म्हणाले.

सध्या ओटीटी माध्यमातून बऱ्याच वेब सिरीज प्रदर्शित होत आहे. त्यात अनेक गोष्टींचे आक्षेपार्ह चित्रण आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "एम्पायर' या वेबसिरीजमध्ये योजनापूर्वक क्रूर मुस्लिम आक्रमकांना उदात्त भूमिकेत दाखवले जात आहे. हे समाजमनाला भ्रमित करणारे आहे. भारतावर आक्रमण करून हिंदूंची देवस्थाने पाडणारे आक्रमक मुस्लिम सुलतान कधीच राष्ट्रनिर्माते होऊ शकत नाहीत, असे परांडे यांनी ठणकावून सांगितले. या सर्व घटना हिंदू समाजाला आक्रोशीत करणाऱ्या असून समाजाला भ्रमीत करण्याचे सुनियोजित कारस्थान आहे. या विरोधात विहिंप जनजागरण करीत असून आवश्यकता पडल्यास आंदोलनही करणार असल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री गोविंद शेंडे, प्रांत प्रचार प्रसार प्रमुख निरंजन रिसालदार उपस्थित होते.

तीन वर्षात रामलला गर्भगृहात
सध्या राम मंदिर पूर्ण करण्यावर फोकस आहे. सप्टेंबर वा ऑक्टोबर अखेरीस पाया पूर्ण होऊन मंदिर बांधकाम सुरू होणे अपेक्षित आहे. पुढील तीन वर्षात ते कळसापर्यंत पूर्ण होऊन डिसेंबर २०२३ मध्ये रामलला गर्भगृहात स्थापन होईल, अशी माहिती परांडे यांनी दिली. मंदिराचे बांधकाम खूप मोठे आहे. तेही पूर्णत्वास जाईल, असे ते म्हणाले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in