नाना पटोले यांना त्यांच्या जिल्ह्यातच भाजपचा धक्का!

अशाखंद्यासमर्थकाने साथ सोडणे नानांना परवडणारे नाही..
Suryakant Ilame
Suryakant Ilame

नागपूर : भाजपवर रोज सडकून टीका करणारे प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nnan Patole) यांनाच भाजपने आज धक्का दिला. नानांचा "उजवा हात" भाजपच्या गळाला लागला. नानांच्या स्वतःच्या जिल्ह्यातील आणि त्यांचे खंदे समर्थक मानले जाणाऱ्या सूर्यकांत इलमे यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केला. (Surykant Ilame joins BJP)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूर्यकांत इलमे यांचे स्वागत केले. या वेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील मेंढे आदी भाजप नेते उपस्थित होते. पटोले यांना ऐन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी मोठा राजकीय धक्का बसला आहे.

भंडारा जिल्ह्यात सूर्यकांत इलमे हे नाना पटोले यांचे खंदे समर्थक मानले जात होके. `जहां नाना, वहां जाना` असे ब्रीदवाक्य ते नेहमी पाळायचे. नाना पटोलेंचे कोणतीही निवडणूक असली तरी इलमे यांचे नाव समोर असायचे. पटोले हे विधानसभा अध्यक्ष झाले तेव्हा `नाना पटोलेसे कुछ काम- तर सूर्या इलमे का नाम` असे समीकरण तयार झाले होते. असे असतांना अचानक नाना पटोले यांना सोडून इलमे यांनी भाजपात प्रवेश केल्याने आता जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

नाना प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्रात  काॅंग्रेस बळकट करण्यासाठी ते राज्य पिंजून काढत आहे. भाजपमध्ये गेलेल्या अनेक काॅंग्रेसच्या अनेक जुन्या नेत्यांना त्यांनी आवर्जून पुन्हा पक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या परिस्थितीत  त्यांना स्वतःच्या जिल्ह्याचा विसर पडला. सध्याच्या आव्हानात्मक स्थितीत  असे खंदे समर्थक भाजपच्या गळाला लागणे हे नाना पटोले यांना परवडणारे नाही.

इलमे यांची राजकीय कारकिर्द

2006 ला राष्ट्रवादी नगरसेवक (भंडारा नगरपरिषद)

*2007-08 भंडारा नगर परिषद उपाध्यक्ष(राष्ट्रवादी),,

*2009 नाना पटोलेंसोबत भाजप प्रवेश

*2010-14 भंडारा नगर परिषद गटनेते(भाजपा)

*2016 ला भाजपा नगराध्यक्ष टिकिट न मिलाल्याने भाजपा सोडून शिवसेना जॉइन

*2016-17 शिवसेना कड़ून नगराध्यक्ष पदाची निवडनुक लढविली मात्र हारले

*2017 शिवसेना शहराध्यक्ष पद सोडत नाना समर्थक झाले

*नानांच्या सर्व निवडणुकीत इलमे यांनी नानांचा कार्यकर्ता म्हणून काम केले. मात्र काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला नव्हता. अखेर 2021 भाजपमध्ये प्रवेश.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com