सुप्रीम कोर्ट फडणविसांच्या हातात आहे का ?

हाविकास आघाडीला विधान परिषद निवडणुकीत मिळालेला कौल म्हणजेच महाविकास आघाडी सरकारने वर्षभरात केलेल्या चांगल्या कामांवर मतदारांनी शिक्का मारला आहे. आरएसएस चा 58 वर्षाचा गड आम्ही उध्वस्त केला आहे.
Vijay Vadettiwar
Vijay Vadettiwar

जालना : फडणविसांच्या हातात सत्ता द्या, मी तुम्हाला आरक्षण देतो, असे म्हणणाऱ्या उदयनराजे भोसलेंवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार चांगलेच बरसले. राष्ट्रीय सेवा संघाचा ५८ वर्षांपासून असलेला गड आम्ही उद्वस्त केला. आरक्षण द्यायला सुप्रीम कोर्ट काय फडणविस यांच्या हातात आहे का, असा प्रश्‍न वडेट्टीवारांनी उदयनराजेंना उद्देशून केला. 

वडेट्टीवार म्हणाले, मंत्रीपद गेलं तरी बेहत्तर, पण मी ओबीसींसोबतच आहे, होतो आणि राहणार. आरक्षणच्या मागणीसाठी आम्ही संपूर्ण ताकतीनीशी मराठा समाजासोबत आहोत, पण ओबीसींमधून आरक्षणाची मागणी करणं सर्वार्थानं चुकीचं आहे. न्यायातून बाजुला कधीही हटणार नाही. जालन्यात पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकारवर ते चांगलेच बरसले. राज्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ओबीसींच्या साथीमुळे महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, औरंगाबादमधील मेळाव्यात गैरसमजुतीतुन वाद झाला होता, तो आता मिटला आहे. 

राज्यातील सर्व जातींना एकत्र करताना थोडा समन्वयाचा अभाव होऊ शकतो. मी मंत्री जरी असलो तरी मंत्रिपद हे औट घटकेचे आहे. मला ओबीसींच्या हक्कासाठी लढावं लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडीला विधान परिषद निवडणुकीत मिळालेला कौल म्हणजेच महाविकास आघाडी सरकारने वर्षभरात केलेल्या चांगल्या कामांवर मतदारांनी शिक्का मारला आहे. आरएसएस चा 58 वर्षाचा गड आम्ही उध्वस्त केला आहे. फडणवीस यांच्या हातात सत्ता द्या, मी तुम्हाला आरक्षण देतो, असं सांगणाऱ्या उदयनराजेंवर देखील वडेट्टीवार चांगलंच बरसले. आरक्षण द्यायला सुप्रीम कोर्ट फडणवीस यांच्या हातात आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com