सुनील केदारांनी कोणत्याही आमदाराचा अपमान केलेला नाही... - sunil kedar has not insulted any mla | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

सुनील केदारांनी कोणत्याही आमदाराचा अपमान केलेला नाही...

मंगेश मोहिते
मंगळवार, 15 जून 2021

मी कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करणार नाही आणि मंत्री सुनील केदार नागपूर जिल्ह्यात विकासाची कामे झपाट्याने करत आहेत. विकास कामात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही.

नागपूर : राज्याचे क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार Sport and animal hunbandary minister Sunil Kedar यांना कामठी विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांचा MLA कुठेही अपमान केलेला नाही. उलट त्यांनीच मंत्री बोलत असताना माईककडे धाव घेऊन वातावरण बिघडवले आणि गोंधळ घडवून आणण्याचा प्रयत्न केला. रावसाहेब दानवे Raosaheb Danwe प्रदेशाध्यक्ष  State President असताना त्यांनी शेतकऱ्यांना कशी शिवीगाळ केली होती, हे साऱ्या देशाने पाहिले आहे. त्यामुळे आम्ही कसे वागावे, हे भाजप नेत्यांनी आम्हाला शिकवू नये, असे प्रत्युत्तर कॉंग्रेसचे सुरेश भोयर Suresh Bhoyar यांनी आमदार टेकचंद सावरकर MLA Tekchand Sawarkar यांच्या आरोपांना दिले आहे. 

काल मंत्री सुनील केदार यांनी कामठी येथे बोलावलेल्या आढावा बैठकीत आमदार टेकचंद सावरकर यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या आरोप सावरकर यांनी केला होता. त्यावरून या बैठकीत एकच गोंधळ उडाला होता. आज सकाळी सावरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री केदारांवर आरोप केल्यानंतर दुपारी सुरेश भोयर यांनी पत्रकार परिषद घेऊन सावरकरांना प्रत्युत्तर दिले. भोयर म्हणाले, आमदार टेकचंद सावरकर यांनी मुद्दामहून गोंधळ निर्माण करून आढावा सभा बिघडवण्याचा प्रयत्न केला. सावरकर यांच्याशी मंत्री केदार आणि आमचा कुठलाही वाद नाही. 

कालही सावरकर यांनी माईककडे धाव घेतली तेव्हा, मंत्री केदार आणि मी स्वतः त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु आमदार ऐकायलाच तयार नव्हते आणि सर्वांच्या आधी बोलण्याची जिद्द करत होते. ती काही भाषण करण्याची जागा नव्‍हती. आढावा बैठक प्रामुख्याने नगरसेवक आणि सरपंचांसाठी होती. त्यामुळे आधी नगरसेवक, सरपंच यांचे बोलणे होईल. त्यानंतर तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल, असे मंत्री केदार आणि मी स्वतः आमदारांना सांगितले. पण त्यांनी ते काही ऐकले नाही आणि तेथे एकच गोंधळ घातला, असे सुरेश भोयर म्हणाले. 

हेही वाचा : ...तर ओबीसी कल्याण मंत्रालय काय कामाचे?, राज्यव्यापी आंदोलन करू ः प्रकाश शेंडगे

दिलगिरी व्यक्त करणार नाही
मी कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करणार नाही आणि मंत्री सुनील केदार नागपूर जिल्ह्यात विकासाची कामे झपाट्याने करत आहेत. विकास कामात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. काहींच्या पोटात दुखत असल्यामुळे अशी कारस्थाने जाणीवपूर्वक केली जात आहेत. आमदार सावरकर सभास्थळी अर्धा तास उशिरा आले. तेव्हा तहसीलदार आणि इतर अधिकारी त्यांचे स्वागत करण्यासाठी बाहेरच्या गेटपर्यंत गेले. शिष्टाचारानुसार त्यांना मंचावर आणले. तरीही त्यांनी गोंधळ घातल्याचा आरोप सुरेश भोयर यांनी केला. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख