रेड्डी यांच्याविरोधात सबळ पुरावे, आयपीएस अधिकाऱ्यांसमोर भाजपचा दावा..

अमरावती ः दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी तत्कालीन अप्पर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांच्या संदर्भातील चौकशीसाठी अमरावतीत आलेल्या अपर पोलिस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांची भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी भेट घेतली. रेड्डी यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याचा दावा करीत ते पुरावे त्यांनी डॉ. सरवदे यांच्यापुढे ठेवले.
Forest Officer Dipali Chavan Sucide Case News Nagpur
Forest Officer Dipali Chavan Sucide Case News Nagpur

अमरावती ः दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी तत्कालीन अप्पर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांच्या संदर्भातील चौकशीसाठी अमरावतीत आलेल्या अपर पोलिस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांची भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी भेट घेतली. रेड्डी यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याचा दावा करीत ते पुरावे त्यांनी डॉ. सरवदे यांच्यापुढे ठेवले.

दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. शिवकुमार या अधिकाऱ्याच्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केली. रेड्डी यांच्या नावानेसुद्धा सुसाईड नोट लिहिली होती. रेड्डी यांनी तक्रारींची दखल घेतली नसल्यानेच दीपाली चव्हाण यांना आत्महत्या करावी लागली, असे आरोप करण्यात आले.

त्यामुळे रेड्डी यांनी विहित कर्तव्य व जबाबदाऱ्यांचे अनुपालन केले अथवा नाही, याबाबत सखोल चौकशी करण्यासाठी शासनाने डॉ. प्रज्ञा सरवदे यांची नियुक्ती केली. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्या मंगळवारी (ता. २७) हरिसाल येथे गेल्या होत्या. दरम्यान, वनविभाग आणि शासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रेड्डी यांना अभय मिळत आहे, असा आरोप  कुळकर्णी यांनी डॉ. सरवदे यांची भेट घेऊन केला.

रेड्डींचा शिवकुमारला वरदहस्तच..

या प्रकरणात अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी दोषी नव्हते तर वनखात्याने रेड्डीची २६ मार्च रोजी तडकाफडकी बदली का केली? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. आत्महत्येपूर्वी दीपाली चव्हाण यांनी तीन सुसाईड नोट लिहिल्या. रेड्डी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांना वारंवार तक्रारी केल्या, रेड्डी यांचाच शिवकुमारला वरदहस्त आहे, रेड्डींना रेकॉर्डिंग ऐकविले, असे स्पष्ट उल्लेख आहेत, असे  कुळकर्णी यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितले.

रेड्डी यांनी अचलपूर न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धाव घेतली होती. विनोद शिवकुमार याच्या सर्व तक्रारी रेड्डी यांच्या कानावर होत्या. मात्र, रेड्डी यांनी विनोद शिवकुमार याच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. दीपाली आत्महत्याप्रकरणात रेड्डी सरकारी दस्ताऐवज फेरफार करू शकतात, अशी शंकासुद्धा. कुळकर्णी यांनी डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्यासोबत चर्चा करताना व्यक्त केली.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com