उपराजधानीत आज आणि उद्या कडकडीत बंद, अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडण्यास बंदी...  - strictly closed today and tomorrow in nagpur ban on wondering without reason | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

उपराजधानीत आज आणि उद्या कडकडीत बंद, अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडण्यास बंदी... 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. बाहेर पडायचेच असल्यास अत्यावश्यक कामासंबंधीचा पुरावा घेऊनच बाहेर पडावे लागणार आहे. अर्थात बाहेर बिनधास्त फिरणाऱ्यांमागे पोलिसांकडून चौकशीची ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. फूटपाथवरील विक्रेत्यांनाही खाद्य पदार्थ पार्सलद्वारे विक्रीस बंदी राहणार आहे.

नागपूर : लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. तुम्ही काहीही करा, आम्ही सोमवारपासून दुकाने सुरू करू, असे काही व्यापाऱ्यांनी निक्षून सांगितले. तरीही शहरात आज आणि उद्या कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. या काळात अत्यावश्‍यक कारणाशिवाय बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली आहे. काल रात्री ८ वाजतापासून यावर अंमलबजावणी सुरू झाली आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय सर्व दुकाने बंद राहणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार असल्याने नागरिकांना पार्सल सुविधा मिळणार नाही. मात्र होम डिलिवरीची सुविधा सुरू राहणार आहे.  

व्यापाऱ्यांचा लॉकडाउनला विरोध असून या पार्श्वभूमीवर उद्यापासून दोन दिवस संपूर्ण लॉकडाउनची अंमलबजावणी आज रात्री आठ वाजतापासून सुरू झाली. दोन दिवस केवळ अत्यावश्यक सेवेतील किराणा, भाजीपाला, फळ, मेडिकल स्टोअर, वैद्यकीय सेवा, पेट्रोलियम सेवा, प्रवासी वाहतूक सेवा सुरू राहणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद राहणार असून येथून केवळ होम डिलिवरीची सुविधा नागरिकांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे कडकडीत बंद पाळण्याचे आदेश असल्याने नागरिकांना दोन दिवस घरांमध्येच राहावे लागणार आहे. 

नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. बाहेर पडायचेच असल्यास अत्यावश्यक कामासंबंधीचा पुरावा घेऊनच बाहेर पडावे लागणार आहे. अर्थात बाहेर बिनधास्त फिरणाऱ्यांमागे पोलिसांकडून चौकशीची ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. फूटपाथवरील विक्रेत्यांनाही खाद्य पदार्थ पार्सलद्वारे विक्रीस बंदी राहणार आहे. दरम्यान, बांधकामे सुरू राहणार आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना मजुरांची ने-आण करता येणार आहे. खासगी वाहने तसेच खासगी बसेस पूर्णतः बंद राहणार आहे. 

हेही वाचा : पोलिस दलात पुन्हा खांदेपालट..फडणवीसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांवर कुऱ्हाड?.

हे सुरू 
वैद्यकीय सेवा, औषधी दुकाने, किराणा, भाजीपाला, फळे, डेअरी, खाद्य पदार्थ दुकाने, मटण दुकाने, पेट्रोल पंप, ऑटो, टॅक्सी, बस सेवा, माल वाहतूक. 

हे बंद 
खासगी वाहने, खासगी बस (औद्योगिक सेवा वगळून), खासगी कार्यालये, उघड्यावर खाद्य पदार्थांची विक्री, हॉटेल, रेस्टॉरंट (केवळ होम डिलिवरी).
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख