या राज्यात एक मुख्यमंत्री तर अनेक सुपर मुख्यमंत्री, फडणवीसांनी घेतला वडेट्टीवारांना चिमटा...

राज्यात काय सुरू आहे, हे कळेनासे झाले आहे. आधी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनलॉकची घोषणा करतात आणि थोड्याच वेळाने मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्या घोषणेचे खंडण करतात. हे म्हणजे राज्य मंत्रीमंडळात कुणाचा कुणाशीच समन्वय नसल्याचे द्योतक आहे.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis

नागपूर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार State Disaster Management Minister Vijay Vadettiwar यांनी काल राज्यातील अनलॉकसंदर्भात जी घोषणा केली. त्यानंतर एक ते दीड तासातच मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या वक्तव्याचे खंडण केले. The Chief Minister's Office refuted his statement त्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारच्या कारभारावर टिका सुरू केली. या राज्यात एक मुख्यमंत्री तर बाकीचे सर्व सुपर मुख्यमंत्री आहेत, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांनी लगावला. 

फडणवीस म्हणाले, राज्यात काय सुरू आहे, हे कळेनासे झाले आहे. आधी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनलॉकची घोषणा करतात आणि थोड्याच वेळाने मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्या घोषणेचे खंडण करतात. हे म्हणजे राज्य मंत्रीमंडळात कुणाचा कुणाशीच समन्वय नसल्याचे द्योतक आहे. खरं म्हणजे मुखमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना शिस्त लावण्याची गरज आहे. जेणेकरून ते असले प्रकार यापुढे करणार नाही. कालच्या प्रकाराने राज्यातील जनतेला संभ्रमात टाकले. महाराष्ट्र लॉक की अनलॉक, याबाबत विविध प्रश्‍न लोकांच्या मनात उभे राहिले. असे सरकार राहिले, तर दुसरी अपेक्षा तरी काय करू शकतो, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. कोरोनाचे लॉकडाऊन असो किंवा मराठा, ओबीसींचे आरक्षण, जेव्हा लोकांना कन्व्हेंस करता येत नाही, तेव्हा त्यांना कन्फूज करायचे, अशा पद्धतीने सरकारचे काम सुरू आहे. कालच्या प्रकाराबद्दल विचारले असता, आपत्ती व्यवस्थापन मंत्री आधी काय बोलले आणि नंतर काय बोलले, हे तुम्ही दाखवलेले आहे. त्यामुळे तुम्हीच त्याबद्दल विचार करा, असे फडणवीसांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. महत्वाच्या विषयांवर एक तर मुख्यमंत्र्यांनी बोलावे किंवा अधिकृतपणे ज्याची नियुक्ती केली आहे, त्याने बोलावे. हे काय आहे की, उठ सूठ कोणताही मंत्री येतो आणि काहीबाही बोलून जातो. याला शिस्त म्हणायची काय, असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला. 

श्रेयवादाची लढाई
राज्य सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. प्रत्येक मंत्री श्रेय लाटण्याचे प्रयत्न करताना दिसतात. काल घडलेला प्रकारही त्यातलाच आहे. मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यायच्या आधी आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांना घोषणा करण्याची घाई झाली होती. त्यामुळे त्यांचीच घोषणा त्यांच्या अंगलट आली. हा केवळ आणि केवळ श्रेय लाटण्याचा प्रकार होता. श्रेय घेण्यास हरकत नाही. पण आदी काम तर करा, असा सल्लाही फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना दिला. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com