कर्मचारी म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालय आठवड्याभरासाठी बंद करा ! 

अधिकारी व कर्मचारी बाधित होत असल्याने त्यांच्यासाठी खासगी व सरकारी रुग्णालयात दहा टक्के खाटा राखीव ठेवण्यात याव्या, उपचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी कार्यालयाकडून अग्रिम राशी देण्यात यावी. जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसातून दोन वेळा सॅनिटायजरची फवारणी करावी.
COLLECTOR OFFICE
COLLECTOR OFFICE

नागपूर : आतापर्यंत जे कोणी कोरोनाचे गांभीर्य घेत नव्हते. त्यांनीही आता कोरोनाची धास्ती घेतली आहे. कोरोनाच्या उद्रेकातून शहरातील एकही शासकीय कार्यालय सुटलेले नाही. वृत्तपत्र कचेऱ्यांवरही कोरोनाचा हल्लाबोल झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातही ५०च्या वर अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे आठवडाभर जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालय बंद ठेवण्याची मागणी नागपूर जिल्हा महसूल तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेने केली आहे. 

दररोज जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूसह इतर कार्यालयांत मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यांची कुठलीही तपासणी करण्यात येत नाही. यानंतरही कोरोना संकटकाळापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कामाचा भार पडला आहे. मार्च महिन्यापासून कुठलीही तक्रार न करता कर्मचाऱ्यांनी आपले काम केले. मात्र, आता कोरोनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विविध विभागांत प्रवेश केला असून, अधिकारी आणि कर्मचारीही बाधित होत आहेत. कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिबंधात्मक उपाययोजनाच करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. 

कार्यालयात येणाऱ्या लोकांची कुठलीही तपासणी न करता त्यांना प्रवेश दिला जातो. यामुळे प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा वगळता इतर विभाग पुढील सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र शिंदोडकर, उपाध्यक्ष रसिका झंझाळ, सरचिटणीस राज ढोमणे, दिनेश तिजारे उपस्थित होते. 

१० टक्के खाटा राखीव ठेवा 
अधिकारी व कर्मचारी बाधित होत असल्याने त्यांच्यासाठी खासगी व सरकारी रुग्णालयात दहा टक्के खाटा राखीव ठेवण्यात याव्या, उपचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी कार्यालयाकडून अग्रिम राशी देण्यात यावी. जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसातून दोन वेळा सॅनिटायजरची फवारणी करावी, अशी मागणीही कर्मचारी संघटनेने केली आहे.           (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com