sports minister kedar says bjp leaders in maharashtra should at least listen to modi | Sarkarnama

क्रीडामंत्री केदार म्हणतात, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी किमान मोदींचे तरी ऐकावे 

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 22 मे 2020

आपल्याच राष्ट्रीय नेत्यांचे ऐकू नये ही दुदैवाची बाब आहे. चुका, भांडणे होतच असतात. मात्र ती करण्याची ही वेळ नाही. सर्वांना एकत्रितपणे, हातात हात घालून या संकटाचा सामना करण्याची ही वेळ आहे. असे असताना भाजप केवळ सत्तेसाठी राजकारण करीत आहे.

नागपूर : कोरोनासारख्या जिवघेण्या आजाराचे संकट राज्यावर घोंघावत असताना भाजपला राजकारणाशिवाय काहीच सुचत नाही. इतक्‍या गंभीर परिस्थितही त्यांनी महाराष्ट्र बचाव आंदोलन करून याचीच प्रचिती दिली आहे. भाजपच्या नेत्यांनी किमान आपल्या पक्षाचे राष्ट्रीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तरी ऐकावे, असा टोला राज्याचे पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी हाणला. 

भाजपच्यावतीने आज राज्यभर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाआघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन केले. केदार यांनी या आंदोलनाचा चांगलाच समाचार घेतला. ही वेळ राजकारणाची नाही. सर्वांनी मिळून करोनाच्या विरुद्ध युद्ध लढायचे आणि जिंकायचे आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मात्र महाराष्ट्रातील भाजप नेते त्यांच्याच आदेशाची अवहेलना करीत आहे. 

आपल्याच राष्ट्रीय नेत्यांचे ऐकू नये ही दुदैवाची बाब आहे. चुका, भांडणे होतच असतात. मात्र ती करण्याची ही वेळ नाही. सर्वांना एकत्रितपणे, हातात हात घालून या संकटाचा सामना करण्याची ही वेळ आहे. असे असताना भाजप केवळ सत्तेसाठी राजकारण करीत आहे. भाजपचही मागील पाच वर्षे सत्तेत होती. संकटाच्यावेळी काय करावे आणि काय करू नये याची जाणीव त्यांना आले. त्यामुळे भाजपला चिंतन आणि मनन करण्याची गरज असल्याचेही सुनिल केदार म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख