आज ना उद्या भाजपचे पाप उघडकीस येईल, मग जनताच धडा शिकवेल...

मुख्यमंत्र्यांनी स्वतः दौरा करून पूरपरिस्थिती पाहिली आहे. यंत्रणेला त्या पद्धतीने सर्व सूचना दिल्या आहेत. त्या पद्धतीने कामे सुरू आहेत. मुख्यमंत्री जर वारंवार तेथे गेले तर यंत्रणा त्यांच्या व्यवस्थेमध्ये लागते आणि असे होऊ नये म्हणून मुख्यमंत्री आवश्‍यक सूचना देऊन परत आले.
Nana Patole
Nana Patole

नागपूर : जासुसीचे जे प्रकरण सध्या समोर आले आहे आणि कर्नाटकचे सरकार त्याच पद्धतीने पाडले गेले आहे. भाजपच्या ज्या चंद्रशेखर बावनकुळेंचं नाव यामध्ये समोर येते आहे. त्याहीपूर्वी यामधील अभिषेक दुबे नावाचा दलाल पकडल्या गेला होता. ही सर्व मंडळी दिल्लीत होती. झारखंडमध्‍ये एफआयआरची नोंद झाली आहे, त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचेही नाव आहे. आज ना उद्या भाजपचे हे पाप उघडकीस येणार आहे. त्यानंतर या देशातील जनताच त्यांना काय शिक्षा द्यायची ती देईल, Then the people will learn the lesson.असे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज येथे म्हणाले. State President of Congress Nana Patole. 

भारतीय जनता पक्ष हा लोकशाहीला न मानणारा पक्ष आहे, असे जनतेचे मत आता तयार झाले आहे. आमदार, खासदारांची खरेदी विक्री करणे आणि सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजपकडून होत आहेत. लोकशाहीचा खून करण्याचे पाप नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक या देशात करत आहेत.

पूरग्रस्तांना तातडीने जी मदत करायची गरज होती, ती राज्य सरकारने केलेली आहे. मृतांच्या नातेवाइकांना भरघोस मदत देण्यासाठीही सरकार पूर्ण प्रयत्नांत लागलेली आहे. निसर्गाच्या या प्रकोपामुळे संपूर्ण व्यवस्थाच विस्कळीत झालेली आहे. सर्वप्रथम प्रश्‍न आहे, तो अन्नधान्याचा. या आपत्तीनंतर लोकांसाठी अन्न, वस्त्र व निवारा याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना या संकटातून पुन्हा उभं राहता येईल, यासाठी सरकार काम करीत आहे. पैशांची मदतही पूरग्रस्तांना सुरू झालेली आहे. अजूनही मृत्यू  पावलेल्या लोकांची पूर्ण प्रेते मिळालेली नाहीयेत. त्याचीही शोधाशोध युद्धपातळीवर सुरू आहे. 

राज्यावर कोसळलेले हे मोठे संकट होते. पण भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने या संकटात राजकारण करत आहे, ते खरोखरच दुर्दैवी आहे. मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. खरे तर अशा परिस्थितीत राजकारण होऊ नये. सर्व राजकीय पक्षांनी खांद्याला खांदा लावून संकटग्रस्तांना मदत केली पाहिजे. पण भाजपकडून हे होताना दिसत नाही, प्रेतांच्या ढिगाऱ्यावरही भाजप राजकारण करत आहे, ही आपल्या देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. विरोधकांचे काम विरोध करायचे आहेच, याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. पण राज्यावर कोसळलेल्या या संकटात तरी त्यांनी विचार करायला हवा, असे नाना पटोले म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांनी स्वतः दौरा करून पूरपरिस्थिती पाहिली आहे. यंत्रणेला त्या पद्धतीने सर्व सूचना दिल्या आहेत. त्या पद्धतीने कामे सुरू आहेत. मुख्यमंत्री जर वारंवार तेथे गेले तर यंत्रणा त्यांच्या व्यवस्थेमध्ये लागते आणि असे होऊ नये म्हणून मुख्यमंत्री आवश्‍यक सूचना देऊन परत आले. आता यंत्रणा योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळत आहे. पंचनामे करणे युद्धपातळीवर सुरू आहेत. फडणवीस सरकारने जो जीआर काढला होता, त्या जीआरप्रमाणेच मदत करण्याचे काम सुरू आहे. मागील सरकारने नियोजित केलेल्यापेक्षा जास्त मदत करण्याचा आमच्या सरकारचा विचार आहे. त्यासाठी उद्या कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो, असेही नाना पटोले यांनी सांगितले. 
 Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com