सोनिया आणि राहुल गांधी हीच काँग्रेसची समस्या : खासदार साक्षी महाराज

संकटाचा सामना करण्यासाठी ‘दवा का साथ दुवाओंकी जरुरत होती है’ भारतीय संस्कार आणि जीवनशैली अशा प्रसंगी महत्त्वाची ठरते. त्यामुळेच आपला देश समर्थपणे कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराचा सामना करीत आहे. साक्षी महाराज यांनी नागपूर भेटीत अनेक सामाजिक संघटना व त्यांच्या प्रतिनिधींच्याही भेटी घेतल्या.
PB25 SAKSHI MAHARAJ
PB25 SAKSHI MAHARAJ

नागपूर : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या वादावर बोलताना भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी सोनिया आणि राहुल गांधी हीच काँग्रेसची मुख्य समस्या असल्याचा टोला लगावला. कोरोना निवळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विश्वगुरु होईल, असा दावाही त्यांनी केला. 

साक्षी महाराज आज नागपूरला आले होते. त्यांनी महाल येथील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. अनेक दिवसांपासून सरसंघचालकांचा आशीर्वाद घेण्यास आपण इच्छुक होतो. एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आज नागपूरला येण्याचा योग आला. त्यामुळे सरसंघचालकांचीसुद्धा भेट झाली. संघाच्या विचाराने आपण राजकारणात आलो. संघ पदाधिकाऱ्यांसोबत भेटीने वैचारिक प्रेरणा मिळते. कोरोनाच्या संकटकाळात अध्यात्माकडे अनेकजण वळत आहे. ही चांगली बाब आहे. 

संकटाचा सामना करण्यासाठी ‘दवा का साथ दुवाओंकी जरुरत होती है’ भारतीय संस्कार आणि जीवनशैली अशा प्रसंगी महत्त्वाची ठरते. त्यामुळेच आपला देश समर्थपणे कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराचा सामना करीत आहे. साक्षी महाराज यांनी नागपूर भेटीत अनेक सामाजिक संघटना व त्यांच्या प्रतिनिधींच्याही भेटी घेतल्या. लोधी महासभाचे उपाध्यक्ष प्रवीण कान्होले, लालसिंह ठाकूर, मोरेश्वर कुमेरिया यांच्याशी महाराजांनी चर्चा केली.       (Edited By : Atul Mehere) 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com