कोझिकोडमध्ये मरण पावलेले साठे नागपुरचे सुपूत्र; गृहमंत्र्यांनी केले सांत्वन 

अपघात झालेले विमान त्यांनी दोन वेळा उतरवण्याचा प्रयत्न केला होता. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी विमान उतरवले. पण अपघात झाला. दीपक साठे अनुभवी पायलट होते. त्यांना एअरफोर्स ॲकेडमीचा प्रतिष्ठित ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ सन्मान आणि 'राष्ट्रपती पदका'ने सन्मानित करण्यात आले होते.
Anil Deshmukh - Sathe
Anil Deshmukh - Sathe

नागपूर : कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीपक नागपूरचे सूपुत्र होते. या घटनेने त्याचे घर असलेल्या भरतनगरसह शहरात शोक आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दुपारी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन, कुटुंबियांचे सांत्वन केले. 

गृहमंत्री देशमुख यांनी साठे कुटुंबियांना धिर दिला. वैमानिक विंग कमांडर दीपक यांचे वयोवृद्ध वडील कर्नल वसंत साठे, आई नीला साठे तसेच नातेवाईक यावेळी उपस्थित होते. दुबईहून केरळमधील कोझीकोड येथील करिपूर विमानतळावर आलेले एअर इंडियाचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरुन अचानक घसरले व दरीत कोसळले. या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले. यात कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राचे सूपुत्र पायलट साठे एनडीएमध्ये कार्यरत होते. 

अपघात झालेले विमान त्यांनी दोन वेळा उतरवण्याचा प्रयत्न केला होता. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी विमान उतरवले. पण अपघात झाला. दीपक साठे अनुभवी पायलट होते. त्यांना एअरफोर्स ॲकेडमीचा प्रतिष्ठित ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ सन्मान आणि 'राष्ट्रपती पदका'ने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा, बहीण अंजली साठे-पराशर, मुलगा धनंजय, शांतनू, स्नुषा वैभवी तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे.  (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com