...तर विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांच्या जिल्ह्यात का नाही केली दारूबंदी ?

चंद्रपूर जिल्हा हा व्याघ्र पर्यटनासाठी देशात प्रसिद्ध आहे. दारूबंदी झाल्यामुळे पर्यटकांनीही जिल्ह्याकडे पाठ फिरविली होती. तत्कालीन सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे पर्यटन क्षेत्राच्या व्यवसायालाही ‘ब्रेक’ बसला होता. त्यामुळे लहानमोठे व्यावसायिक, चहा टपऱ्या चालविणाऱ्यांच्या व्यवसायांवर परिणाम होऊन त्यांची उपासमार झाली.
Balu Dhanorkar
Balu Dhanorkar

नागपूर : महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते Leader of the Opposition in the State of Maharashtra Devendra Fadanvis बोलले की, हा चुकीचा निर्णय आहे. मग त्यांनी गेल्या ७ वर्षांपासून त्यांच्या नागपूर जिल्ह्यात का दारूबंदी केली नाही. Why no alcohol ban has been imposed in his Nagpur district for 7 years मागच्या सरकारमध्ये दारूबंदीचा घेतलेला निर्णय हा अतिशय घाईगडबडीत घेतला गेला होता आणि तो चुकीचा होता, असं मत कॉंग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर MP Balu Dhanorkar यांनी व्यक्त केलं. राज्य सरकारच्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने लोकांचे रोजगार हिरावून घेतले आहेत. हे लोक दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार होते. केंद्र सरकारने तशी घोषणाही केली होती. पण ते करू शकले नाहीत. त्यांच्या घोषणेप्रमाणे ७ वर्षांत १४ कोटी लोकांना रोजगार यांनी द्यायला पाहिजे होता, पण ते ही मंडळी करू शकले नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांची रोजीरोटी सुरू होती, ती दारूबंदीच्या निर्णयाने या लोकांनी हिरावून घेतली. पण आता दारूबंदी उठवण्याचा जो निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, याचे सकारात्मक निकाल समोर येतील, असे खासदार धानोरकर ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले. 

चंद्रपूर जिल्ह्यात जेव्हा दारूबंदी करण्याचे वारे वाहत होते, तेव्हा दारूबंदी करण्याच्या बाजूने लोकांनी मोर्चा काढला होता, त्यापेक्षा दारूबंदी करू नये, या मताच्या लोकांनी जो मोर्चा काढला होता, तो तुलनेत चारपट मोठा होता, हे चंद्रपूरची जनता अजून विसरलेली नाही. तत्कालीन राज्य सरकारच्या दारूबंदीच्या निर्णयामुळे लहान मोठे व्यवसाय डबघाईस आले होते आणि शासनाचा अंदाजे ८०० कोटी रुपयांचा महसूल बुडत होता. चंद्रपूर जिल्ह्याचे वातावरण गढूळ झाले होते. पोलिस प्रशासनातले अधिकारी दारू माफियांच्या रडारवर आले होते. पोलिसांवर हल्ले मोठ्या प्रमाणात होत होते. काही पोलिस अधिकाऱ्यांचा यामध्ये मृत्यूही झाला होता. परिणामी पोलिस प्रशासनावर मोठा ताण आला होता. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता प्रशासनही कुठेतरी स्थिरावल्या जाईल, असे खासदार धानोरकर म्हणाले. 

तसेही देश कुठे चालला आहे, जग कुण्या दिशेने वाटचाल करीत आहे, या बाबींचा विचार करता तत्कालीन सरकारचा निर्णय सयुक्तिक नव्हताच. दारूबंदी केल्यानंतर जिल्ह्यात गुंडागर्दी सुरू झाली होती. जिल्ह्यात जरी दारूबंदी होती, तरी जिल्ह्याच्या सीमांना लागून असलेल्या इतर जिल्ह्यातून आणि राज्यांतून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत होती. यामध्ये बनावट दारूचाही पुरवठा जिल्ह्यात होत होता. त्यात लोक मृत्युमुखी पडले. काही जण सॅनिटायझर पिऊन मरण पावले, हे सुद्धा रेकॉर्डवर आहे. दारूच्या अवैध धंद्यामध्ये पुरुषांसह महिला आणि लहान मुलेही गुंतले होते आणि हे पोलिस प्रशासनाच्या रेकॉर्डवर आहे, असे खासदार धानोरकर यांनी सांगितले.

पर्यटन क्षेत्राचेही नुकसान...
चंद्रपूर जिल्हा हा व्याघ्र पर्यटनासाठी देशात प्रसिद्ध आहे. दारूबंदी झाल्यामुळे पर्यटकांनीही जिल्ह्याकडे पाठ फिरविली होती. तत्कालीन सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे पर्यटन क्षेत्राच्या व्यवसायालाही ‘ब्रेक’ बसला होता. त्यामुळे लहानमोठे व्यावसायिक, चहा टपऱ्या चालविणाऱ्यांच्या व्यवसायांवर परिणाम होऊन त्यांची उपासमार झाली. जिल्ह्यात २५ ते ३० हजार लोक बेरोजगार झाले. कोळसा खाणीतील अधिकारी आणि कामगार हे जिल्ह्यात राहीनासे झाले होते. ते इतरत्र राहायला गेले होते. त्यामुळेही जिल्ह्याची मोठ्या प्रमाणात अधोगती झाली होती. राज्य सरकारच्या आजच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील लोकांचा बुडालेला रोजगार त्यांना परत मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असल्याचे खासदार बाळू धानोरकर म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com