...तर सचिन वाझेंचाही मनसुख हिरेन व्हायला वेळ लागणार नाही ! - so it would not take long to sachin waze to become mansukh hiren too | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

...तर सचिन वाझेंचाही मनसुख हिरेन व्हायला वेळ लागणार नाही !

अरुण जोशी
गुरुवार, 18 मार्च 2021

या प्रकरणाचे सर्व धागेदोरे आता लवकरच जुळणार आहेत. त्यामुळे सचिन वाझेंचाही खून केला जाऊ शकतो. कारण या प्रकरणात वाझेंना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न राज्य सरकारने केला. पण त्यांना ते शक्य झाले नाही आणि आता वाझेंची चौकशी एनआयए करीत आहे. त्यामुळे त्याच्या जिवाला धोका आहे.

अमरावती : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सचिन वाझे यांच्यावरच विरोधी पक्षाने गाजवले. त्यानंतरही हे प्रकरण थंड होण्याची चिन्हे दिसत नाहीये. आता या प्रकरणात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांनी उडी घेतली आहे. एनआयएने सचिन वाझेंना मुंबई पोलिसांपासून वाचवून ठेवले नाही, तर वाझेंचा मनसुख हिरेन व्हायला वेळ लागणार नाही, असे खासदार राणा म्हणाल्या. 

एनआयएने सचिन वाझेंच्या सुरक्षेकडे लक्ष दिले पाहिजे. कारण या प्रकरणात आता राजकारणातील बडी नावे समोर येणार आहेत की, ज्यांचे तार मातोश्रीपर्यंत जुळलेले आहेत. ही नावे एनआयएच्या चौकशीत बाहेर येणारच आहेत. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात हालचाली होत आहेत. त्यावरून हे स्पष्टपणे जाणवते की या प्रकरणात मोठे मासे गळाला लागणार आहेत. पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्तांची उचलबांगडी याच कारणामुळे केली गेल्याचे खासदार नवनीत कौर राणा म्हणाल्या. 

हेही वाचा : उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेचे राजकीय 'बॉस'...

आमदार रवी राणा म्हणाले, सचिन वाझेंना एनआयएने अटक केल्यानंतर त्यांनी एनआयएला जी माहिती दिली. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात मोठा राजकीय स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रकरण ज्या प्रकारे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभवती फिरत आहे. मनसुख हिरेनला सुरक्षा देण्याची मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडे वारंवार केली, पण सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. शेवटी मनसुख हिरेनचा खून झाला. त्यानंतर सचिन वाझेंनी जे काही नियोजन केले होते, ते सर्वांच्या समक्ष आले. हे प्लानिंग करण्यासाठी सचिन वाझेंना कुणी सांगितलं वा कुणी त्यांच्यावर दबाव टाकला, हेदेखील चौकशीत पुढे येणार आहे. 

या प्रकरणाचे सर्व धागेदोरे आता लवकरच जुळणार आहेत. त्यामुळे सचिन वाझेंचाही खून केला जाऊ शकतो. कारण या प्रकरणात वाझेंना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न राज्य सरकारने केला. पण त्यांना ते शक्य झाले नाही आणि आता वाझेंची चौकशी एनआयए करीत आहे. त्यामुळे त्याच्या जिवाला धोका आहे. पोलिस आयुक्तांना हटवून काहीच होणार नाही. तर मातोश्रीच्या भोवताल फिरणाऱ्यांवर नजर ठेवली पाहिजे आणि मुंबई पोलिसांपासून वाझेंना वाचवून ठेवावे, अशी मागणी आमदार राणा यांनी केली आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख