मुख्यमंत्र्यांच्या घरात शिरला साप, अन पोलीसांची उडाली भंबेरी 

जुलै २०१८ मध्ये पावसाळी अधिवेशन नागपुरात झाले. या अधिवेशनाला दोन दिवस शिल्लक असताना रामगिरीवर तीन साप निघाले होते. एवढेच नव्हे त्यावेळी तत्कालीन मंत्री पंकजा मुंढे यांच्या कॉटेजमध्येही दोनदा साप निघाले होते.
snek at cm house
snek at cm house

नागपूर : हल्ली कोठेही साप निघाला की पहिले आठवण होते ती सर्पमित्राची. या दिवसांत साप बाहेर निघण्याचे प्रमाण मोठे आहे. आज चक्क सिव्हिल लाईन्समधील मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या निवासस्थानी भला मोठा साप निघाला. तैनात असलेल्या पोलीसांच्या शस्त्रांना साप गुंडाळी मारुन बसला होता. हे बघून पोलीसांची भंबेरी उडाली. मग त्यांनीही तेच केले जे सामान्य लोक करतात. सर्पमित्राला पाचारण केले आणि सर्पमित्राने सापाला पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले. 

रामगिरीतील एका खोलीत सहा ते सात फूटाचा मोठा साप आढळला. अर्ध्या तासाच्या थरारानंतर सर्पमित्राने सापाला पकडले. आज सकाळी साडेअकरा वाजता वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री निवासस्थानातील पोलिसांच्या वायरलेस कक्षामध्ये तेथे कार्यरत पोलिसांना सहा ते सात फूटांचा साप दिसला अन् एकच तारांबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीचा अपवाद वगळता एरवी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरीवर शांतता असते. परंतु आज सापामुळे झालेल्या धावपळीमुळे अनेकांची पाऊले उत्सुकतेपोटी रामगिरीकडे वळली. येथील पोलिसांनी तत्काळ सदर पोलिस स्टेशनला माहिती देत सर्पमित्राला बोलावण्याची विनंती केली. 

सदर पोलिसांनी हायकोर्ट परिसरातच वास्तव्यास असलेले सर्पमित्र शुभम पराळे यांच्याशी संपर्क केला. शुभम पराळे दहा मिनिटांमध्ये रामगिरी येथे पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी वायरलेस कक्षात प्रवेश केला. या कक्षात पोलिसांनी ठेवलेल्या बंदूक आदी शस्त्रावर साप गुंडाळी मारून बसला होता. सापाच्या भीतीने पोलीस कक्षाबाहेर होते. सर्पमित्र पराळे यांनी दहा मिनिटे सापासोबत संघर्ष करीत त्याच्यावर नियंत्रण मिळवले. त्यांनी सापाला एका पोत्यात भरून बंदिस्त केले. सापाला पकडल्यानंतर सेमीनरी हिल येथील ट्रांझिट सेंटरवर पंचनामा करून वनविभागाच्या स्वाधिन करण्यात आले. सापाला कान्होलीबारा किंवा हिंगणा परिसरातील जंगलात सोडण्यात येईल, असे सर्पमित्र शुभम पराळे यांनी सांगितले. 

दोन वर्षांपूर्वी तीन साप 
जुलै २०१८ मध्ये पावसाळी अधिवेशन नागपुरात झाले. या अधिवेशनाला दोन दिवस शिल्लक असताना रामगिरीवर तीन साप निघाले होते. एवढेच नव्हे त्यावेळी तत्कालीन मंत्री पंकजा मुंढे यांच्या कॉटेजमध्येही दोनदा साप निघाले होते. पावसाळ्यात रामगिरी परिसर विविध झाडे व वनस्पतीमुळे गर्द हिरवाईने नटला असतो. या काळात साप तसेच इतर किटकांचाच या परिसरात जास्त वावर असल्याने नागरिकांत कायम भीती असते.    (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com