उपराजधानीत स्थिती गंभीर, आज दोन दगावले, बाधित 625 

कोरोनाबाधितांमध्ये 9 महिन्यांच्या चिमुकल्यापासून तर 73 वर्षे वयोगटातील वृद्ध व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. विशेष असे की, तरूण वयातील रुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग केवळ वयोवृद्ध आणि लहान मुलांना अधिक होतो, हा समजही यानिमित्ताने खोटा ठरला आहे.
nagpur zero mile-corona
nagpur zero mile-corona

नागपूर : मेडिकलच्या अतिदक्षता विभागात सारी आजारावरील उपचारासाठी भरती असलेल्या अमरावती येथील 65 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले. काही तासांतच या व्यक्तीचा मृत्यू झाला. 65 वर्षीय व्यक्तीसह मध्यप्रदेशातील सतना येथील 62 वर्षीय महिलेचादेखील कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला आहे. दोन्ही मृत्यू मेडिकलमध्ये झाले आहेत. यामुळे शहरात मृतकांची संख्या 13, तर बाधितांची संख्या 625 वर पोहचली. 

आज आणखी 12 जणांचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. अमरावती येथून 3 जून रोजी मेडिकलच्या अतिदक्षता विभागात यांना उपचारासाठी हलविले. ताप, सर्दी, खोकला तसेच श्‍वनसाचा गंभीर त्रास असल्याने तत्काळ व्हेंटिलेटरची गरज पडली. सारी आजार असल्याचे निदान झाले. परंतु शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार कोविड चाचणी केली असता, कोरोनाबाधित असल्याचे निदान प्रयोगशाळेतून आले. दरम्यान उपचाराला दाद मिळत नसल्याचे आढळले. 4 जून रोजी पहाटे सव्वासहा वाजता त्यांचा श्‍वास कायमचा थांबला. हीच स्थिती मध्यप्रदेशातील सतना येथील महिलेची आहे. बुधवारी दाखल केल्यान 3 जून रोजी सकाळी 6.45 वाजता या महिलेला मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. लगेच दुसऱ्या दिवशा म्हणजे आज दुपारी 2 वाजता या महिलेचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. यामुळे उपराजधानीत कोरोनाच्या विषाणूची लागण झाल्यामुळे दगावलेल्यांची संख्या 13 वर पोचली आहे. 

चिंतेची बाब म्हणजे शहरातला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या बजाजनगरात पुन्हा कोरोनाचा प्रसार झाल्यामुळे हा भाग सील करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (निरी), एम्स आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) विषाणू प्रयोगशाळेतून 13 नमूने तपासले गेले. या प्रयोगशाळेतून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये लोकमान्य नगरसह गांधीबागेतील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला असला तरी लक्षणे नसलेल्यांना दर दिवसाला मेयो व मेडिकलमधून सुटी देऊन घरी पाठविण्यात येते. आतापर्यंत कोरोनावर मात करून बरे झालेल्यांची संख्याही 412 झाली आहे. 

लॉकडाउन शिथिलतेने प्रार्दुभाव वाढला 
लॉकडाऊनच्या शिथिलतेमुळे प्रादुर्भाव संख्या गेल्या आठवड्याभरापासून झपाट्याने वाढत आहे. कोरोना बाधितांसह मृत्यूचा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे. 30 मे ते 4 जून 2020 या कालावधीत दीडशे कोरोनाबाधित आढळले. तर 31 मे रोजी 2 आणि 4 जून रोजी 2 असे आवडाभरात 4 जण दगावले आहेत. काही नव्या वसाहतींचा कंटेनमेंट झोनमध्ये समावेश झाल्याने तेथील नागरिक दहशतीत आहेत. 

कोरोनाचा संसर्ग सर्व वयोगटात 
लहान मुलांना तसेच वयस्कांना सर्वाधिक कोरोना संसर्गाची जोखीम असल्याचे वैद्यक तज्ज्ञांकडून सांगण्यात येत होते. मात्र शहरात आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये 9 महिन्यांच्या चिमुकल्यापासून तर 73 वर्षे वयोगटातील वृद्ध व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. विशेष असे की, तरूण वयातील रुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग केवळ वयोवृद्ध आणि लहान मुलांना अधिक होतो, हा समजही यानिमित्ताने खोटा ठरला आहे. 

शहरातील कोरोनाचे मृत्यू... 
-5 एप्रिल रोजी सतरंजीपुरा येथील 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
-29 एप्रिल रोजी मोमीनपुरा येथील 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू 
-5 मे रोजी पार्वतीनगर येथील 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू 
-11 मे रोजी पांढराबोडी येथील 29 वर्षीय युवकाचा मृत्यू 
-16 मे रोजी गड्डीगोदाम येथील 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू 
-17 मे रोजी शांतीनगर येथील 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
-18 मे रोजी मोमीनपुरा येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू 
-25 मे रोजी मोमीनपुरा येथील 54 वर्षीय व्यक्ती 
-27 मे रोजी सतरंजीपुरा येथील 71 वर्षीय महिलेचा मृत्यू 
-39 मे रोजी रस्त्यावरचा भिक्षेकऱ्याचा मृत्यू 
-31 मे रोजी हिंगणा रोडवरील 73 वर्षीय वृद्धाचा मृत्यू 
-4 जून रोजी अमरावती येथील व्यक्तीचा मृत्यू 
-4 जून रोजी मध्यप्रदेशातील महिलेचा मृत्यू 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com