श्रीनिवास रेड्डीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर राज्यभर पडसाद उमटले होते. रेड्डीच्या अटकेची मागणीने जोर धरला होता. घटनेनंतर २६ दिवसांनी त्याला अटक करण्यात आली होती.
Deepali Chavan - MS Reddy
Deepali Chavan - MS Reddy

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसालच्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस कोठडीत असलेला निलंबित मुख्य वनरक्षक अधिकारी श्रीनिवास रेड्डी याला आज धारणीच्या न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता दीपाली चव्हाण प्रकरणातील सहआरोपी असलेल्या श्रीनिवास रेड्डीच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

चार दिवसांपूर्वीच त्याला धारणी पोलिसांनी नागपुरातून अटक केली होती. त्यानंतर त्याला गुरुवारी न्यायालयात दाखल केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, आज त्याची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, श्रीनिवास रेड्डीला जामीन मिळावा, यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले. 

गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर राज्यभर पडसाद उमटले होते. रेड्डीच्या अटकेची मागणीने जोर धरला होता. घटनेनंतर २६ दिवसांनी त्याला अटक करण्यात आली होती, हे विशेष  सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. भारत भगत यांनी काम पहिले तर आरोपी रेड्डी कडून वकील मनीष जैसवानी, दीपक वाधवानी यांनी काम पाहिले.

महिनाभरापूर्वी श्रीनिवास रेड्डींचे निलंबन
आरएफओ दीपाली चव्हाण यांनी आपण वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची एक सुसाईड नोट लिहिली आणि गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर डीएफओ विनोद शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावरून तात्काळ अटक करण्यात आली. तसंच त्यांचं निलंबनही करण्यात आलं. त्यानंतर काही दिवसांनी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांची उचलबांगडी करण्यात आली होती. तर महिन्याभरापूर्वी रेड्डी यांचे निलंबन करण्यात आले होते.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com