धक्कादायक! ८ वर्षाच्या मुलाकडून करवून घेतली शौचालयाची सफाई, बीडीओवर कारवाई..

त्या मुलाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. पालकमंत्री झाल्या प्रकारावर काय कारवाई करतात, याकडे आता आमचे लक्ष लागले आहे. या घटनेची पुनरावृत्ती राज्यात कुठेही होऊ नये, यासाठी गटविकास अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.
Sangrampur
Sangrampur

बुलडाणा : जिल्ह्यातील संग्रामपूर Sangrampur येथे एका ८ वर्षाच्या मुलाकडून विलगीकरणातील स्वच्छता गृहाची सफाई करवून घेण्यात आली. The cleaning house in the segregation was cleaned समाजाच्या सर्वच स्तरातून या प्रकाराचा निषेध केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली The district administration took this seriously असून संग्रामपूर गटविकास अधिकारी संजय पाटील Block Development Officer Sanjay Patil यांना कारणे दाखवा नोटीस Show Couse Notice देण्यात आली आहे आणि लवकरच त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. 

यासंदर्भात जिल्हाधिकारी राममूर्ती यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, या प्रकरणात एक चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. कामकाजाच्या तीन दिवसांचा वेळ या समितीला देण्यात आला आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक कर्मचारीही दिसत आहे, त्या कर्मचाऱ्याला कुणी असा आदेश दिला, याचाही तपास केला जात आहे. हा प्रकार ज्याने कुणी केला, तो चीड आणणारा आहे. याचे समर्थन कुणीही करणार नाही. मानवतेला लाजवणारी ही घटना आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार म्हणाल्या, घडलेली घटना अतिशय लाजिरवाणी आहे. या गोष्टीचा आम्हा सर्वांना खेद आहे. आपल्या जिल्ह्यात लहान मुलाकडून अशी कामे करवून घेतली गेली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत. प्रशासनानेही ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी घडलेल्या घटनेची चौकशी करणार आहेत. संग्रामपूरचे बीडीओ, शिक्षणाधिकारी जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.  

अधिकाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे : चित्रा वाघ
बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील मारोडी शाळेत विलगीकरण केंद्रामध्ये १५ रुग्ण असताना एका ८ वर्षाच्या चिमुकल्याकडून शौचालय साफ करवून घेण्यात आले. हे काम करवून घेताना प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे. या ठिकाणी परवा जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा नियोजित होता. ते मारोडी या गावी येतील, या भीतीने गटविकास अधिकाऱ्यांनी तेथील प्रशासनाला सांगितले. त्यांना सफाईसाठी कुणीही सापडले नाही, म्हणून त्यांनी छोट्या मुलाला धमकावून त्याच्याकडून शौचालय साफ करवून घेतले.

त्या मुलाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. पालकमंत्री झाल्या प्रकारावर काय कारवाई करतात, याकडे आता आमचे लक्ष लागले आहे. या घटनेची पुनरावृत्ती राज्यात कुठेही होऊ नये, यासाठी गटविकास अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com