धक्कादायक : सर्वाधिक मृत्यू झालेल्या महिन्यांतील माहिती शासनाला पाठवलीच नाही... - shocking information of the large numbers of death not been given to the government | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : सर्वाधिक मृत्यू झालेल्या महिन्यांतील माहिती शासनाला पाठवलीच नाही...

निलेश डोये
गुरुवार, 10 जून 2021

संबंधित विस्तार अधिकाऱ्याकडे त्याचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला. येथे अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे जन्म-मृत्यूची माहितीच अद्ययावत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, विभागाकडे फक्त जानेवारीपर्यंतच्याच माहितीची नोंद आहे.

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत Second Wave पहिल्या लाटेपेक्षाही जास्त मृत्यू झाले. मृत्यूचे आकडे लपवण्यात येत असल्याचे आरोप दरम्यानच्या काळात करण्यात आले. सर्वाधिक मृत्यू एप्रिल आणि मे महिन्यात झाले. most deaths occurred in the month of april and may ही माहिती जिल्हा परिषदेकडे Zillha Parishad असणे क्रमप्राप्तच होते. पण धक्कादायक बाब म्हणजे नेमक्या याच महिन्यांतील जन्म आणि मृत्यूंची माहिती जिल्हा परिषदेकडे नाही. त्यामुळे ती शासनालाही पाठवण्यात आली नाही. त्यामुळे मृत्यूचे आकडे लपविले Death figures hidden जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे बोलले जात आहे. 

जिल्हा परिषदेकडे जन्म आणि मृत्यूच्या आकड्यांची नोंद फक्त जानेवारी महिन्यापर्यंतचीच आहे. फेब्रुवारीपासूनची नोंदच नाही. या टेबलाचे काम प्रभारीवर असल्याने माहिती अद्ययावत करण्यात येत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद याबाबत गंभीर नसल्याची चर्चा आहे. येवढा गंभीर काळ असताना जिल्हा परिषदेचा महत्वपूर्ण विभाग कसा काय वाऱ्यावर सोडण्यात आला, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. जन्म आणि मृत्यू नोंदणी हा महत्वपूर्ण विभाग आहे. तेथील कर्मचारी निवृत्त झाल्यास तत्काळ दुसऱ्याची नियुक्ती तेथे करणे गरजेचे आहे. पण तसे न केल्याने महत्वाची आकडेवारी राज्य शासनाला मिळू शकली नाही. शासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. 
 

मुंबईत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची खरी माहिती शासनाकडून लपविण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून लावण्यात आला आहे. कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूचा आकडा प्रशासनाकडून रोज जाहीर करण्यात येतो. परंतु प्रशासनाकडून जाहीर होत असलेले आकडे आणि प्रत्यक्ष मृत्यूचे आकडे, यात मोठी तफावत असल्याची चर्चा आहे. ग्रामीण भागात झालेली जन्म-मृत्यूची नोंद जिल्हा परिषदेकडे ठेवण्यात येते. जन्म-मृत्यू नोंदीचा टेबल पाहत असलेला कर्मचारी निवृत्त झाला. तीन-चार महिने कोणत्याही कर्मचाऱ्याकडे ‘त्या’ टेबलच चार्ज देण्यात आला नाही. नंतर एका विस्तार अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. 

हेही वाचा : परमबीरसिंह प्रकरण : याचिकेला नवीन वळण, कार्तिक भटने केले गंभीर आरोप...

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित विस्तार अधिकाऱ्याकडे त्याचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला. येथे अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे जन्म-मृत्यूची माहितीच अद्ययावत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, विभागाकडे फक्त जानेवारीपर्यंतच्याच माहितीची नोंद आहे. तेवढीच माहिती शासनाकडे पाठविण्यात आली. त्यानंतरच्या चार महिन्यांची माहिती शासनाकडे पाठविण्यातच आली नसल्याचे समजते. मार्च, एप्रिल व मे महिन्यात कोरोना मृत्यूची संख्या अधिक होती आणि नेमकी याच महिन्यांतील माहिती शासनाला पाठविण्यात आलेली नाही. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख