शिवसेनेच्या खंडणीबाज कडवला पीसीआर, भावाच्या नावे कोट्यवधीची संपत्ती 

सुपारी व्यापाऱ्यांकडून 50 लाख रूपये खंडणी महिन्याकाठी उकळणाऱ्या कडवने अलिशान कार खरेदीवर भर दिला होता. तसेच त्याच्याकडे महागड्या बाईक्‍सपण आहेत. पोलिसांनी तीन महागड्या कार आणि बाईक जप्त केली आहे. मंगेशने शिवसेनेतील विश्‍वासू मित्रांच्या नावांवर 12 ते 15 महागड्या कार खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
Mangesh Kadao
Mangesh Kadao

नागपूर : डॉक्‍टर पत्नीच्या नावे लाखो रुपयांची संपत्ती जमा करणारा शिवसेनेचा निलंबित शहरप्रमुख मंगेश कडवच्या भावाच्या नावेही कोट्यवधींची संपत्ती असल्याची बाब तपासात समोर आली आहे. पक्षासाठी निधी गोळा करण्याच्या नावावर त्यांने ही कोट्यवधींची माया जमविली आहे. त्याच्या अन्य नातेवाईकांच्या नावेही संपत्ती करुन ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले. आज कडवला न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंबित शिवसेना शहरप्रमुख मंगेश कडववर आतापर्यंत खंडणी, वसुली आणि फसवणूकीचे जवळपास पाच गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात डॉक्‍टर पत्नी रूचितासुद्धा आरोपी आहे. तिच्यावरही गुन्हे दाखल आहेत. मंगेशविरूद्ध गुन्हे दाखल होताच तो फरार झाला होता. अटकेच्या भीतीपोटी त्याची पत्नी डॉ. रूचिता हिने व्हिम्स हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचे नाटक केले होते. मात्र, डॉक्‍टरांनी सुटी देताच बाहेर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी डॉ. रूचिताला अटक करताच पती मंगेश आणि कंपनीमध्ये खळबळ उडाली होती. गुन्हे शाखेने डॉ. रूचिताचा पीसीआर घेतल्यामुळे हातपाय लुळेपांगळे झालेल्या मंगेशने एका मोठ्या नेत्याच्या छत्रछायेत गुन्हे शाखेकडे शरण येण्याची भूमिका घेतली होती. 

तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच एपीआय किरण चौगुले यांनी त्याला पांढराबोडीतून अटक केली. मंगेश कडवने आतापर्यंत गैरमार्गाने कमविलेल्या संपत्तीचा हिशेब गुन्हे शाखा करीत आहे. मंगेशचा भाऊ व्यापारी आहे. त्याची कमाई आणि त्याच्याकडे सध्या असलेली संपत्ती याचा ताळमेळ पोलिस बसवित आहेत. मंगेशने सुपारी व्यापारी आणि सावकारांकडून खंडणी स्वरूपात उकळलेले कोट्यवधी रूपये आपल्या भावाकडे वळते केले. अनेक ठिकाणी प्रॉपर्टी घेतली तर लाखो रूपये डॉ. रूचिता हिच्या नातेवाईकांना देऊन त्यांच्याही नावे प्रॉपर्टी घेतली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मंगेशची पत्नी डॉ. रूचितालाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले. तिला न्यायालयाने एमसीआर देऊन कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले होते. 

मंगेशकडे लक्‍झरी कार 
सुपारी व्यापाऱ्यांकडून 50 लाख रूपये खंडणी महिन्याकाठी उकळणाऱ्या कडवने अलिशान कार खरेदीवर भर दिला होता. तसेच त्याच्याकडे महागड्या बाईक्‍सपण आहेत. पोलिसांनी तीन महागड्या कार आणि बाईक जप्त केली आहे. मंगेशने शिवसेनेतील विश्‍वासू मित्रांच्या नावांवर 12 ते 15 महागड्या कार खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याने शेअर मार्केट आणि भूखंडामध्येही कोट्यवधी रूपये गुंतवल्याची चर्चा आहे.    (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com