शहरप्रमुखाने लाच घेतल्याचा आरोप, शिवसेनेत खळबळ 

सुमारे 35 वर्षांपासून मी शिवसेनेत काम करीत आहे. आजवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. या प्रकरणाशी कुठलाच संबंध नाही. आरोप लावणाऱ्याने पहिले आपले चरित्र बघावे. या विरोधात न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यात येईल. स्वतः धापोडकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे आपला या प्रकरणाची संबंध नसल्याचे जाहीर केले असल्याचेही प्रकाश जाधव यांनी सांगितले.
Mangesh Kadao
Mangesh Kadao

नागपूर : शिवसेनेचे शहरप्रमुख मंगेश कडव यांनी जिल्हाप्रमुख पदावर नियुक्त करण्यासाठी लाज घेतल्याचा आरोप शिवसेनेचे माजी पदाधिकारी अशोक धापोडकर यांनी केला आहे. धापोडकर यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण नंतर त्यांनी माघार घेतली. यामध्ये जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांचेही नाव गोवण्यात आले आहे. याविरोधात न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा करण्यात येणार असल्याचे प्रकाश जाधव यांनी सांगितले. 

जिल्हाप्रमुख म्हणून नेमण्यासाठी 25 लाखांची लाच दिल्याच्या आरोपाने शिवसेनेत चांगलीच खळबळ उडाली आहे. मंगेश कडव यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांचेही नाव या निमित्ताने चर्चेत आले. तक्रारकर्त्याने आता माघार घेतली असली तरी त्याच्या विरोधात मानहानीचा दावा जाधव दाखल करणार आहे. तक्रारदार अशोक धापोडकर शिवसेनेचे माजी पदाधिकारी आहे. बुधवारी त्यांनी बजाजनगर पोलिस ठाण्यात तक्रार करून शहरप्रमुख कडवे यांनी जिल्हाप्रमुखपदावर नियुक्त करण्यासाठी 25 लाख घेतल्याचा आरोप केला आहे. सोबतच विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्‍वासन दिले होते, असेही धापोडकर यांनी सांगितले. 

जिल्हाप्रमुखांच्या सांगण्यावरून हे सगळे झाले होते असा त्यांचा दावा आहे. हा प्रकार उघडकीस येताच काल शिवसेनेच्यावतीने तातडीने पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले. उमेदवारी देणे आपले काम नाही. निवडणुकीच्या काळात संघटनेसाठी धापोडकर यांच्याकडून आर्थिक मदत घेण्यात आली. गडचिरोलीतील पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर धापोडकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांना परत यायचे असल्याने ते अशा प्रकारे दबाव टाकत असल्याचे कडव यांनी सांगितले. यावेळी शहरप्रमुख राजू तुमसरे, किशोर ठाकरे आदी उपस्थित होते. 

अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार ः जाधव 
सुमारे 35 वर्षांपासून मी शिवसेनेत काम करीत आहे. आजवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. या प्रकरणाशी कुठलाच संबंध नाही. आरोप लावणाऱ्याने पहिले आपले चरित्र बघावे. या विरोधात न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यात येईल. स्वतः धापोडकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे आपला या प्रकरणाची संबंध नसल्याचे जाहीर केले असल्याचेही प्रकाश जाधव यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com