shiv sena will not do politics regarding ram temple said eknath shinde | Sarkarnama

राम मंदिराच्या विषयात शिवसेना राजकारण करणार नाही : एकनाथ शिंदे

राजेश चरपे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

आपणा रस्त्याच्या विकासाची कामे सुरु करणार आहोत. नक्षलग्रस्त भागाच्या विकासाला प्राधान्य देणार आहो. भाजपने दूध दरवाढीसाठी आंदोलन केले आहे. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, या संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आहे, मुख्यमंत्री शेतकरी संघटनेच्या संपर्कात आहेत.

नागपूर : राम मंदिर हा आमच्यासाठी अस्मिता व श्रद्धेचा विषय आहे. त्याचे राजकारण शिवसेना करणार नाही. ज्यांना करायचे त्यांनी शुखाल करावे, असे प्रत्युत्तर राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्व हिंदू परिषद व त्यांच्याशी सलग्न संस्थांना दिले.

पालकमंत्री या नात्याने ते दोन दिवसांसाठी गडचिरोलीच्या दौऱ्यावर आले असता नागपूर विमानतळावर प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नसताना अयोध्येला जाऊन आले व मुख्यमंत्री झाल्यावर अयोध्येला गेले होते. त्यामुळे कोण काय म्हणते याला अर्थ नाही. आमच्यासाठी हा राजकारणाचा आधीपासूनच मुद्धा नव्हता आणि आजही नाही. राममंदिराच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. देशावर कोरोनाचे संकट असल्याने ऑनलाईन भूमिजपून करावे, असाही सल्ला दिला जात आहे. सध्या भूमिपूजनाऐवजी कोण जाणार, कोण नाही, याचीच चर्चा अधिक केली जाते. यावर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.

सध्या राज्यावर कोरोनाचे संकट आहे. या संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यास आम्ही प्रथम प्राधान्य दिले आहे, ही राजकारण करण्याची वेळ नाही, विरोधी पक्षाला शिंदे यांनी आपल्या शैलित उत्तर दिले, गडचिरोली मध्ये सीआरपीएफ व पोलीस जवान मोठया प्रमाणात कोरोना बाधित झाले आहेत. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की कोरोना योध्दे म्हणून पोलीस जवान कोरोनाचा सामना करीत आहेत. आम्ही त्यांची काळजी घेत आहो. आज बाधित पोलिस जवानांची भेट घेणार आहे. गडचिरोलीत ४ ऑगस्टपासून शाळा सुरू होणार का, असे विचारले असता ते म्हणाले की मी आज आढावा घेईल. त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ.

गडचिरोलीत रस्ते नसल्यामुळे गरोदर महिलेला २५ किलोमिटर पायपीट करून रूग्णालयात जावे लागत आहे, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की आपणा रस्त्याच्या विकासाची कामे सुरु करणार आहोत. नक्षलग्रस्त भागाच्या विकासाला प्राधान्य देणार आहो. भाजपने दूध दरवाढीसाठी आंदोलन केले आहे. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, या संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आहे, मुख्यमंत्री शेतकरी संघटनेच्या संपर्कात आहेत.   (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख