शिवसैनिक म्हणतात, लॉकडाऊन करा; गोळीबार चौकात केले आंदोलन

महापालिका कोरोनाचे संक्रमण रोखण्यात संपूर्ण अपयशी ठरली आहे. रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णांना बेड मिळत नसल्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. हे लक्षात घेऊन सरकारचे व महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
Shivsena Andolan
Shivsena Andolan

नागपूर : कोरोनाचा उच्छाद तासागणिक वाढत आहे. उपाययोजना तोकड्या पडत आहेत. लॉकडाऊन संदर्भात कुणाचाच पायपोस कुणाच्या पायात नाही. तुकाराम मुंढे येथून बदलून गेले, तरीही पालिकेतील सत्ताधारी लॉकडाऊन बाबत ठोस निर्णय घेऊ शकत नाहीये. रुग्णसंख्या ६० हजारांवर पोहोचली आहे. ही साखळी तोडण्यासाठी नागपूर महापालिका प्रशासनाने १४ दिवसांचा कडक लॉकडाउन करावा, या मागणीसाठी शिवसेनेने आज गोळीबार चौकात आंदोलन केले. तत्पूर्वी उपजिल्हाप्रमुख सुरज गोजे यांनी महापालिका आयुक्त व महापौरांना या मागणीचे निवेदन दिले होते.  

महापालिकेने शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली. पण या संचारबंदीमुळे कोरोनाची साखळी तुटणे अशक्य आहे. याकरिता उपजिल्हा प्रमुख सुरज गोजे, विधानसभा संघटक राजेश कनोजिया, सुनील बॅनर्जी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. महापालिका कोरोनाचे संक्रमण रोखण्यात संपूर्ण अपयशी ठरली आहे. रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णांना बेड मिळत नसल्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. हे लक्षात घेऊन सरकारचे व महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. कोणतेही राजकारण न आणता सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन सुरज गोजे यांनी यावेळी केले.

आंदोलनात गुलाम रसूल, पोटीवाला ,नरेंद्र मगरे, केतन रेवतकर, सुखदेव ढोके, महेंद्र काठाने, नरेंद्र मगरे,एजाज जीलानी,अनिल बोरकर, सागर मौन्देकर,धीरज काटे, विकास देशमुख,सतीश डायरे, चिंतामण परशिवणीकर, उत्तम रंभाड,इश्वर पिंपळे, हरीश पाठरबे,कपिल करोडकर,निखिल धकते, सुनील कावळे, नंदू मारोडे,फ़ैयाज कच्ची, तेजस गोजे, राजेश मातूरकर, नवीन बारापात्रे,अनुप साधनकर, जगदीश मंडलेकर,आदी सहभागी झाले होते.    (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com