नाराजीमुळे नव्हे, तर राजकीय प्रगतीसाठी सोडली शिवसेना : खासदार धानोरकर 

लोकांची कामे करण्यासाठी सत्ता पाहिजे, सत्ता असली की पक्षसुद्धा बळकट होतो. यापुढील निवडणूक केंद्रीय पद्धतीने लढण्याची गरज आहे. भाजप त्याच पद्धतीने लढते, म्हणून त्यांच्या जास्त जागा निवडून येतात. नाहीतर भाजपचे अनेक खासदार असे आहेत, की जे नगरसेवक म्हणूनही निवडून येऊ शकत नाही
Balu Dhanorkar
Balu Dhanorkar

नागपूर : मी शिवसेनेत कधीही नाराज नव्हतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझे तेव्हाही चांगले संबंध होते आणि आजही आहेत. नाराजीमुळे मी शिवसेना सोडल्याचे बोलले जात होते. पण नाराजीमुळे नव्हे, तर राजकीय प्रगतीसाठी शिवसेना सोडली, असे कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर म्हणाले. 

श्री धानोरकर म्हणाले, भारतीय जनता पक्षासोबत शिवसेनेची आतापर्यंत युती होती. त्यामुळे शिवसेना ४८ जागांवर उमेदवार देऊ शकत नव्हती. शिवसेनेत मी २७ वर्षे होतो, पण युतीमुळे मला फार काही करता आले नाही, पुढे जाता आले नाही. शिवसेना वाढू नये, यासाठी भाजप सतत प्रयत्नरत असते. ज्यावेळी भाजप आणि शिवसेना वेगवेगळी लढली. तेव्हा कुठे मी आमदार होऊ शकलो. युतीचा फायदा शिवसेनेला कधीच झाला नाही. पण आता शिवसेना वेगळी झाल्याने त्या पक्षाला फायदा होईन आणि कार्यकर्त्यांना संधी मिळू शकेल. 

निवडून येण्याची क्षमता नसलेल्या व्यक्तिला उमेदवारी देऊन पक्षाची जागा गमावण्यात काही अर्थ नसतो. पण मतदारसंघात चांगले काम असेल तर नेत्यांचा मुलगा, भाऊ, बायको किंवा इतर नातेवाईकाला उमेदवारी देण्यात काहीच हरकत नाही. कॉंग्रेसला लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेल्या नवीन उमेदवारांना संधी द्यावी लागेल. नवीन उमेदवार हे ७० टक्के असावे, तर ३० टक्के जागा निष्ठावंतांना द्याव्या. जुनी रणनिती सोडून हे नवी धोरण पक्षाने अंगिकारल्यास लोकसभेत पक्षाच्या जागा निश्‍चितपणे वाढतील, असा विश्‍वास धानोरकर यांनी व्यक्त केला. 

कॉंग्रेसमध्ये मी संघटनेत काम करावे, असा सूर सुरुवातीला होता. पण चंद्रपूर लोकसभा आणि त्यातील सहा विधानसभा मतदारसंघांवर लक्ष द्यायचे असल्याने ती जबाबबादारी मी नाकारली. केवळ पक्ष, संघटन येवढाच विचार करुन चालणार नाही. कारण लोकांची कामे करण्यासाठी सत्ता पाहिजे, सत्ता असली की पक्षसुद्धा बळकट होतो. यापुढील निवडणूक केंद्रीय पद्धतीने लढण्याची गरज आहे. भाजप त्याच पद्धतीने लढते, म्हणून त्यांच्या जास्त जागा निवडून येतात. नाहीतर भाजपचे अनेक खासदार असे आहेत, की जे नगरसेवक म्हणूनही निवडून येऊ शकत नाही, असा टोला खासदार धानोरकर यांनी हाणला.    (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com