नागपुरात शिवसेनेने लावला कॉंग्रेसला सुरुंग

अंगद छत्तीसगढी युवा ब्रिगेडचे अध्यक्ष व अ.भा. तेली महासंघाचे प्रदेश सचिव आहेत. ते काँग्रेसचे असले तरी भविष्यात याचा सर्वाधिक फटका भाजपला बसू शकतो. पूर्व नागपूरमध्ये तेली आणि छत्तीसगडी समाज मोठ्या प्रमाणात आहे. हे बघता महापालिकेच्या निवडणुकीत याचा शिवसेनेला चांगला फायदा होऊ शकतो.
Congress to Shivsena
Congress to Shivsena

नागपूर : कोरोनाचा उपद्रव शहरात दिवसागणिक वाढत चालला आहे. कोरोनाच्या विरोधात आम्ही सर्वपक्षीय एक होऊन लढत आहोत, असे राजकीय पुढारी कितीही सांगत असले तरी ते केवळ बोलण्यासाठी आहे. शहरात एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्याचे काम सुरू आहे. नुकतेच शिवसेनेने पूर्व नागपुरातील कॉंग्रेसचे कार्यकर्ते गळाला लावले आहेत. त्यामुळे आता कॉंग्रेसही चुपचाप बसेल असे वाटत नाही. कॉंग्रेसनेही शिवसैनिक फोडण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे. 

महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला राजकीय पक्ष लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. शिवसेनेने कॉंग्रेस कार्यकर्त्यांची चालवलेली फोडाफोड हे त्याचेच द्योतक असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेचे शहर संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस कमिटीचे महासचिव अंगद हिरोंदे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश घेतला. अंगद छत्तीसगढी युवा ब्रिगेडचे अध्यक्ष व अ.भा. तेली महासंघाचे प्रदेश सचिव आहेत. ते काँग्रेसचे असले तरी भविष्यात याचा सर्वाधिक फटका भाजपला बसू शकतो. पूर्व नागपूरमध्ये तेली आणि छत्तीसगडी समाज मोठ्या प्रमाणात आहे. हे बघता महापालिकेच्या निवडणुकीत याचा शिवसेनेला चांगला फायदा होऊ शकतो. 

अंगद यांच्यासोबत गोपाल वाघ, आल्हाद खरे, जगदीश पटोडी, मनोज शाहू, मुकेश यादव, रवी शाहू, जोहन शाहू, विनोद उइके, पिंटू शाहू, बसंत वर्मा, किशोर कुरवे, शैलेश माहेश्वरी, राकेश हिरवानी, प्रकाश बर्मन, जीतू महिलांगे, कैलाश बर्मन, आत्मा बाडाबाग, आत्मा हिरवानी, सुखचंद यादव,हेमंत ब्रम्हे,अजय सबरसांठी, शैख महफूज,दीना शाहू, तुलसी शाहू, रवी वाघमारे,भारत सरवा, हेमरू शाहू, राजूभाई जुम्मन,श्रीकांत रेकुलवार, चैतराम शाहू,अनिल गायागवाल,नीलेश बघेल,आकाश बंजारे, संतोष शाहू यांचा प्रामुख्याने समावेश आहे. प्रवेश समारंभाला शहर समन्वयक नितिन तिवारी,किशोर पराते, गुड्डू रहांगडाले, अजय दलाल, किशोर ठाकरे, प्रवीण जुमडे, राजू वाघमारे, सिद्धू कोमजवार, आशिष देशमुख आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com