शिवसेनेचा शहरप्रमुख खंडणीबाज मंगेश कडव फरार 

शिवसेनेचा शहरप्रमुख खंडणीबाज मंगेश कडव याच्याविरूद्ध अनेक तक्रारी समोर येत आहेत. मंगेशने अनेकांच्या प्रॉपर्टी हडप केल्या आहेत. अनेकांना शिवसेनेच्या नावावर खंडणी वसुल केली आहे. मंगेशने जवळपास 20 गुंड पोसले होते. त्यामुळे त्याच्याशी कुणीही पंगा घेत नव्हते. मात्र, आता तपास थेट क्राईम ब्रॅंचकडे आला आहे. मंगेशविरूद्धच्या तक्रारींची शाहनिशा करण्यात येत आहे.
Mangesh Kadao
Mangesh Kadao

नागपूर : शिवसेनेचा शहरप्रमुख खंडणीबाज मंगेश कडव याचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. त्यानंतर भीतीपोटी कडव फरार झाला असून पोलीस त्याच्या शोधात आहे. कडववर तीन गुन्हे दाखल झाले आहेत. याचा तपास गुन्हेशाखेचे खंडणीविरोधी पथक करणार आहे. या पथकात दोन अधिकारी आणि दहा कर्मचारी आहेत. येनकेनप्रकारे लोकांकडून पैसे घेतल्यानंतर परत मागणाऱ्याला मंगेश जिवे मारण्याच्या धमक्‍या देत होता. त्यामुळे लोक घाबरलेले होते. पण आता लोकांनी निर्भीडपणे तक्रारी कराव्या, असे आवाहन गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी केले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास रामकृष्ण चौधरी (वय 44, रा. कस्तुरबा लेआउट, बजाजनगर) यांचे बजाजनगरात मातोश्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नावाने प्रॉपर्टी डिलींगचे कार्यालय आहे. चौधरी यांना लेआउट टाकण्यासाठी जमीन विकत घ्यायची होती. ही बाब हेरून शिवसेनेचा शहरप्रमुख खंडणीबाज मंगेश कडव याने हेरली. त्याने लगेच चौधरी यांचे कार्यालय गाठले. वानाडोंगरीत भूखंड असल्याची माहिती दिली. विक्रीचा सौदा करायचा असून भूखंड पाहण्यासाठी येण्यासाठी विनंती केली. 6 ऑक्‍टोबर 2006 ला वानाडोंगरीतील दुसऱ्याच्या मालकीचे असलेल्या कमल लेआउटवर नेले. तेथे नकाशा दाखवून विक्रीचा सौदा केला. 

"जमीन आत्ताच विकत घ्या. मग भाव वाढतील, तर मी विकणार नाही.' असे सांगितले. त्यामुळे घाईघाईत चौधरी यांनी साडेतीन लाख रूपयांत त्या भूखंडाचा सौदा केला. टोकन रक्‍कम म्हणून मंगेश कडवने 50 हजार रूपयांची मागणी केली. चौधरी यांनी लगेच धनादेश दिला. त्यानंतर रजिस्ट्री करून देण्यासाठी मंगेश टाळाटाळ करीत होता. उर्वरित पैसे वारंवार मागत होता. त्यामुळे चौधरी यांना मंगेशच्या वागणुकीवरून संशय आला. त्यामुळे त्यांनी भूखंडाचे कागदपत्र मागितले असता मंगेश पैसे मागायला लागला. "तेरे पैसे तो मैं खा गया...लेकीन जान प्यारी हैं तो पतली गली से निकल' अशी धमकी दिली. या प्रकरणी चौधरी यांनी बजाजनगरात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी खंडणीबाज मंगेश कडववर गुन्हा दाखल केला. 

शिवसेनेचा शहरप्रमुख खंडणीबाज मंगेश कडव याच्याविरूद्ध अनेक तक्रारी समोर येत आहेत. मंगेशने अनेकांच्या प्रॉपर्टी हडप केल्या आहेत. अनेकांना शिवसेनेच्या नावावर खंडणी वसुल केली आहे. मंगेशने जवळपास 20 गुंड पोसले होते. त्यामुळे त्याच्याशी कुणीही पंगा घेत नव्हते. मात्र, आता तपास थेट क्राईम ब्रॅंचकडे आला आहे. मंगेशविरूद्धच्या तक्रारींची शाहनिशा करण्यात येत आहे. कडव फरार असून, त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. पीडितांनी कडवच्या विरोधात नीर्भिडपणे तक्रार करावी, असे आवाहन गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com